शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: काेराेना नियम धुडकावणाऱ्यांना दणका, हाॅटेलमालकासह ४९ पर्यटकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:47 IST

coronavirus: नांदगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जमावबंदी कायदा मोडून होळी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर धडक मारून रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

पालघर : नांदगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जमावबंदी कायदा मोडून होळी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर धडक मारून रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या वेळी ४९ पर्यटकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.पालघर तालुक्यात १७ ते २७ मार्च या अवघ्या १२ दिवसांत ६८७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर नगरपालिका क्षेत्रासह बोईसरमधील ६ गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आल्याने रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे हे बोईसर भागाची पाहणी करीत असताना सातपाटी सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदगाव बीचवर सांज रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक होळी सण साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ रिसॉर्टमध्ये धडक मारली असता नवी मुंबई आदी भागातून ऑनलाइन बुकिंगद्वारे ४९ तरुण-तरुणी यांचे ग्रुप आलेले असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सपोनि सुधीर धायाळकर यांनी आपत्ती व्यवस्थापन  अधिनियमान्वये रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला, तर ४९ पर्यटकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत होळी सण साजरा करताना जमावबंदीचा कायदा तोडल्याप्रकरणी आगरवाडी व माकुणसार येथील प्रत्येकी दोन अशा चार जणांविरोधात केळवे सागरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ५ एप्रिलपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्च रोजी काढला होता.  केळवे येथे चौघांवर गुन्हे  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ५ एप्रिलपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी २५ मार्च रोजी काढला होता. त्यात हॉटेल्स, रिसॉर्ट, परमिट रूम यावर वेळेचे बंधन घालण्यात आले होते. माकूणसार येथे ८० ते ९० नागरिक जमा केल्या प्रकरणी कमलाकर पाटील व नितीन ओमकार यांच्याविरोधात तर आगरवाडी येथील विकास गावड व प्रकाश गावड यांच्याविरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि भीमसेन गायकवाड यांनी गुन्हे दाखल केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघरVasai Virarवसई विरार