शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Corona Virus: ‘कोरोना’च्या भीतीने आठवडा बाजार थंडावला; ग्राहकांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 23:20 IST

औद्योगिकीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

वाडा : तालुक्यातील कुडूस येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात हजारो ग्राहक वस्तू खरेदीसाठी येत असतात, मात्र सध्या कोरोना विषाणूची भीती असल्याने आजच्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याने बाजार थंडावल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांची बाजारात तुरळक गर्दी दिसून येत होती.

औद्योगिकीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आज दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात असली तरी बाजाराचे महत्त्व कमी झालेले नाही. कुडूस ही ५२ गावांची बाजारपेठ असून लोकसंख्या सुमारे ५० ते ७५ हजारांच्या आसपास आहे. तसेच या परिसरात शेकडो कारखाने असल्याने हजारो कामगार येथे वास्तव्यास आले आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय नागरिक बाजारात येत असल्याने येथे मोठी गर्दी होत असते. हा बाजार सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतो. या बाजारात घोटी, इगतपुरी, नाशिक, वसई, अर्नाळा, पालघर येथील व्यापारी आपला माल घेऊन येत असतात.गर्दीत जाणे टाळा...सध्या कोरोना व्हायरसची नागरिकांना भीती वाटत असल्याने प्रशासनाकडूनही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी भीतीपोटी गर्दीच्या ठिकाणी जाणे बंद केल्याने कुडूसचा बाजार थंडावल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस