शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरातून तांबा-पितळेची भांडी झाली कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:48 IST

ग्रामीण महिलांच्या जीवनशैलीत बदल 

- राहुल वाडेकर विक्रमगड : अनेक वर्षापासून घरोघरी जेवण शिजविण्यासाठी वापरली जाणारी पिढीजात तांबा-पितळेची भांडी सध्याच्या धावपळीच्या व आधुनिक युगामध्ये ग्रामीण महिलांच्या स्वयंपाकघरातून कालबाह्य झाल्याचे चित्र दिसत आहे. या भाड्यांचा आरोग्यदायी उपयोग माहिती असतानाही बदलत्या जीवनशैलीत झटपट अन्न तयार करण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या स्टेनलेस स्टील, फायबर किंवा इतर धातूंच्या भांड्यांना जवळ करीत तांबा, पितळेच्या भांड्यांना कालबाह्य केले आहे.

आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्यांची भांडी सर्रास वापली जात होती. चुलीत लाकडे जाळून अन्न तयार करताना या भाड्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते, परंतु आताच्या आधुनिक युगामध्ये चुलीऐवजी स्टोव्ह, गॅस, शेगडी अशा विविध व झटपट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वजनाने हलक्या धातूंच्या भांड्यांना महत्त्व आले.

आता सर्रासपणे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या धातूंपैकी काही धातूंच्या भाड्यांत अन्न शिजविणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याकडे अनेकदा लक्ष वेधले गेले असले तरी या धातूच्या भांड्यांचा वापर कमी होण्याऐवजी अधिकच वाढत आहे. या भाड्यांवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही असेही म्हटले आहे. तर अनेक जण सध्या जुनी परंपरागत पिढीजात पितळी व तांबेची भांडी कवडीमोल भावाने सर्रासपणे मोडीत काढीत आहेत आणि त्याऐवजी दुसºया धातूंची भांडी घेतली जात आहेत. पूर्वी पितळेची समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा याचा वापर देवपूजेत अधिक होत असे. मात्र तेही साहित्य सध्या मोडीत निघायला लागले आहे.

स्टेनलेस स्टील किंवा थेट चांदीच्या वस्तू देवघरात दिसू लागल्या आहेत. ज्याच्या घरात तांब्या-पितळेची भांडी अधिक तशी त्यांची श्रीमंतीही लक्षात यायची. ज्यांनी ही भांडी मोडीत काढली नाहीत त्यांनी ती स्वयंपाकघरातून केवळ शोभेपुरती ठेवली आहेत. तांब्या पितळ्याच्या भाड्यांचा लग्नात आहेर करण्याची पद्धत बंदच झाली आहे. रुकवतातही स्टेनलेस स्टीलने घुसखोरी केली आहे. तांबा आणि पितळेची भांडी भविष्यात भावी पिढीसाठी ऐतिहासिक ठेव्याप्रमाणे वाटली तर नवल वाटणार नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र