पालघर : जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी मुरबे येथील बांधकाम ठेकेदाराच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.मुरबे येथील भंडार आळीत राहणारे ठेकेदार प्रकाश पाटील हे २६ मार्च रोजी घरी येत असताना काही तरुणांनी बाइक आडव्या लावून रस्ता अडवला. पाटील यांनी बाइक बाजूला घेण्यास सांगितले असता, पाटील यांचा भाऊ पंकज पाटील याने शर्टाची कॉलर पकडून दमबाजी केली. मात्र, सहकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर प्रकरण मिटले. दरम्यान मी मारहाण केलेली नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)
ठेकेदाराच्या कुटुंबाला मारहाण
By admin | Updated: March 29, 2017 03:41 IST