शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

करवाढ टाळून वसई-विरारकरांना दिला दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:03 IST

महापालिकेचा अर्थसंकल्प : अतिरिक्त आयुक्तांनी प्रशासक गंगाथरन डी. यांना केला सादर

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसई-विरार शहर महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांनी प्रशासक गंगाथरन डी.  यांना सादर केला. महापालिकेचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात यंदा काेणत्याही प्रकारची करवाढ सुचवलेली नाही. त्यामुळे काेराेना काळातील लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना माेठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात आराेग्य सुविधांसाठी भरीव तरतूद करतानाच वसईतील कला-क्रीडा क्षेत्र आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकी एक काेटींची तरतूद करण्यात आली आहे.महापालिकेचा २०२०-२१चा सुधारित १८७०.७४ कोटी व २०२१-२२चा मूळ २०००.२८ कोटींचा अर्थसंकल्प आहे. २०२१-२२ या मूळ अर्थसंकल्पात कोणताही कर आणि दरवाढ सुचवलेली नाही. हा अर्थसंकल्प  सादर करताना महापालिकेचे मुख्य  लेखा व वित्त अधिकारी अरुण कोल्हे, मुख्य  लेखापरीक्षक सुरेश बनसोडे, उपसंचालक नगररचना विभाग वाय. एस. रेड्डी, लेखा विभागाच्या अनुजा किणी, मिलिंद  पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. परिणामी, कोविड-१९ मुळे रखडलेली विकासकामेही यावर्षी मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पात असेल, अशी माहिती यावेळी महापालिका सूत्रांनी दिली. बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महत्त्वाचे म्हणजे अखेर उशिरा का होईना, पण वसईच्या चिमाजी आप्पा  किल्ल्यासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.   तर वसईचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक कोटींची तरतूद आहे. तसेच जुने रस्ते आता यूटीडब्ल्यूटी पद्धतीने विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सुटावी, यासाठी पालिकेने विशेष जोर दिला आहे. यासाठी प्रशासनाने बायोमिथेन व बायोमायनिंगसाठी १४७.५४ कोटींचा प्रकल्प शासनाकडे सादर केला आहे.  तर दुसरीकडे सफाईसाठी यांत्रिक झाडू शहरात लवकरच येणार असल्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. 

अर्थसंकल्पातील तरतुदी nअर्थसंकल्पात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनेसाठी १०.४८ कोटींची तरतूद nमागासवर्गीय योजनांसाठी २९.६४ कोटींची तरतूदnखोलसापाडा धरण टप्पा १ व टप्पा  २ बांधण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. यासाठी २३१.९० कोटींची तरतूद केली आहे.nचिमाजी आप्पा किल्ला संवर्धनासाठी एक काेटींची तरतूदnसांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक काेटींची तरतूद