शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

पालघर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:16 IST

अनुसूचित जाती-जमाती, अत्याचार निवारण आणि प्रतिबंध अधिनियम १९८९ (अ‍ॅट्रॉसिटी) कायदा सर्वाेच्च न्यायालयाने शिथिल केल्यानंतर देशभरातील दलित व आदिवासी समाजाने त्याला विरोध केला असून मंगळवारी त्यानिमित्ताने भारत बंदची हात दिली होती. पालघर जिल्ह्यात या हाकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून कुठेही हिंसाचार झाला नाही. जिल्ह्यातील पालघर, डहाणू, बोईसर भागामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून वाडा, जव्हार भागामध्ये रस्ते रोखण्यात आले. तर मोखाडा, तलासरी, वसई, विरार आदी शहरी भागामध्ये बंद जाणवलाच नाही.

पालघर : अनिवासी एकता परिषद आणि सहकारी संघटनांच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या ‘भारत बंद’ ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. ‘भारत बंद’ चे होर्डिंग्ज मागील काही दिवसा पूर्वी पासून जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात लावण्यात आल्याने तसेच सोशल मीडिया वरूनही हा मेसेज फिरत असल्याने बहुतांवशी लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.पालघर शहरासह, मनोर मस्तान नाका, सफाळे येथे बंदला चांगला पाठिंबा मिळाला. पालघर रेल्वे स्टेशन समोर एसटी बस,तीन आसनी,सहा आसनी रिक्षामुळे गजबजलेला परिसर सोमवारच्या बंद मुळे शांत होता. रेल्वे प्लॅटफॉर्म वर ही तुरळक गर्दी दिसत होती. लोकल मधून घरी परतणाऱ्या प्रवाश्यांना रिक्षा मिळत नसल्याने आपल्या घरून नातेवाईकांना बोलवावे लागत होते.अनेक प्रवाशी पायी चालत आपले घर, कार्यालय गाठीत होते. बोईसर येथे आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, आरपीआय चे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन लोखंडे, नरेंद्र करकाळे, जब्बार सोळंकी, रु पेश लोखंडे आदी सह बसपाच्या कार्यकर्त्यांनी बोईसर शहरात फिरून कायदा पुनरचने बाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने बोईसर वासीयांनी ह्या बंद मध्ये सहभाग घेतला.वाडा शहरात करण्यात आलेला रास्तारोको मुळे पालघर, जव्हार डेपोच्या लांब पल्ल्याच्या बसेस अडवल्याने त्या फेर्या रद्द करण्यात आल्या. तर डहाणू भागातील सायवन, गंजाड,वाणगाव आदी अनेक भागात बंद ला मोठा पाठिंबा मिळाला.पालघर आदिवासी एकता परिषद,भूमिसेना, आदिवासी श्रमिक महिला मंडळ आदी जिल्ह्यातील सहयोगी संघटनांच्याच्यावतीने हा बंद चे आयोजन करण्यात आले होते. ह्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले निवेदन देण्यात आले. दरम्यान, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिसांचे आवाहनजिल्ह्यात संघटनांनी पालघर बंदचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्ते पालघर मधील अनेक उद्योजक यांना मंगळवारी बंद ठेवणे बाबत फोन करत आहेत. याद्वारे आपणास आवाहन करण्यात येते की, मा. उच्च न्यायालयाचे निर्णयाप्रमाणे कोणताही बंद हा कायदेशीर नसतो आणि तो स्वत:हून असावा. जर कोणी बंद ठेवण्यासाठो कोणत्याही व्यवसाईकास धमकावत असेल किंवा बंद ठेवणेकरीता जबरदस्ती करत असेल अशातक्र ारी प्राप्त झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पालघर पोलिसांनी यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. पालघर पोलिसांनी सर्व व्यावसायिकांना तेस आवाहन केले आहे.डहाणूमध्ये कडकडीतडहाणू : दलित व आदिवासी संघटनांनी केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालघर जिल्हयात आदिवासी एकता परिषद, भूमीसेना, वाणगाव, नागझरी, डहाणू, गंजाड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.वाणगाव येथे आदिवासी एकता परिषदेचे भरत बामनिया, आशिष दुबळा, निलेश वाढाण, रघुनाथ सुतार, रमेश आहडी, कमलेश कोम, विलास सुमडा यांनी बंदचे आवाहन केले. बंदचा परिणाम म्हणजे मंगळवारी वाणगाव कासा वाहतुक बंद ठेवण्यात आली होती.व्यापाºयांनी घातली हुज्जतसफाळे : भारत बंद पाळण्यात आला तरी येथील औषधांची दुकाने, दुध, दवाखाने वगैरे अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. सकाळी नऊ- साडे नऊच्या सुमारास आदिवासी एकता परिषद आणि भूमिसेनेने बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापारी वर्गाला दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या वेळी काही व्यापारी आणि मोर्चेकरी यांच्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना नसल्याने आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे व्यापाºयाचें म्हणणे होते.बाजारावर बंदचा प्रभावबोर्डी : बंदचे पडसाद तालुक्यातील शहरी भागात दिसून आले. रेल्वे स्थानक ते पारनाका, इराणी रोड, थर्मल पॉवर रस्ता, सागरनाका या भागातील दुकाने बंद होती. मेडिकल स्टोर आणि चहाचे स्टॉल काही भागात उघडे होते. याबाबत कोणत्याही संघटनांचे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी निदर्शने दिसले नाहीत. अथवा या बंद मध्ये सहभाग नोंदविल्याची माहितीही त्यांच्याकडून देण्यात आली नसल्याचे डहाणू पोलिसांकडून सांगण्यात आले.जव्हारमध्ये निवेदनजव्हार: सर्वाेच्य न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल केल्याने नाराज झालेल्या दलित व आदिवासी संघटनांनी सोमवारी जव्हारचे उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे यांना निवेदन देऊन सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी असे आवाहन केले. दरम्यान, येथे कोणताही बंद पाळण्या न आल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. या वेळी गोविंद बल्लाळ, राजेश धात्रक आदी उपस्थित होते.व्यवहार सुरळीततलासरी : आदिवसी व दलित संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम तलासरी शहर व बाजारपेठेमध्ये जाणवला नाही. आठवडा बाजार असल्याने तुडूंब गर्दी होती. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते. आदिवासी भाग असल्याने येथे बंद कडकडीत पाळला जाईल अशी अपेक्षा होती.खंडेश्वरीनाक्यावर चक्काजामवाडा : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार व्हावा यासाठी आदिवाशी युवा संघटनेच्यावतीने सोमवारी वाड्यातील खण्डेश्वरी नाका येथे सुमारे दोन तास रास्ता रोको केला. मोर्चेकºयांनी भिवंडी-वाडा व मनोर- वाडा महामार्ग बंद करण्यात आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस १ ते दीड किमी वर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बस स्थानकापासून ते खण्डेश्वरी नाक्यापर्यंत आदिवाशी युवा मोर्चाच्यावतीने रॅली काढून रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाला इतर मागासवर्गिय संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. भारत बंद असल्याने वाडा शहर बंद करण्यात यावे असा पवित्रा आंदोलकांनी घेऊन रास्तारोको केला होता. वाडा बंदच्या मागणीनंतर वाडा व्यापारी संघटना आणि मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळात वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मध्यस्थीने चर्चा करून वाडा शहर बंद करण्याचे ठरले त्यानंतर हा रास्तारोको मागे घेण्यात आला. या रस्तारोकोमुळे विद्यार्थी, नागरिक तसेच नोकरदारवर्गाची प्रचंड गैरसोय झाली. रास्तारोको अंदोलनाचे नेतृत्व आदिवासी युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष नितिन भोईर, उपाध्यक्ष-दिनेश पथवा, सचिव गणेश थालेकर, संतोष साठे यांनी केले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदVasai Virarवसई विरार