शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पालघर जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी तणावाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 00:45 IST

नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद

पालघर/पारोळ : देशाची ढासळती आर्थिक स्थिती तसेच नागरिकत्व सुधारणा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी चांगला प्रतिसाद लाभत असताना पालघर शहारामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून बंदच्या कार्यात अडथळे आणले. यामुळे जिल्ह्यात काही काळ तणावाचे वातावरण होते. बंद दरम्यान अडथळे आणणाऱ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील पालघर, वसई तालुक्यातील शहरी भाग वगळता अन्य सहा तालुक्यांत बंदचा विशेष प्रभाव जाणवला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीने राज्यभर बंदची घोषणा केल्यानंतर पालघर शहरात बंद पाळण्यात येणार असल्याने शहरातील विविध व्यापारी संघटनांनी आपली दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवीत आम्ही बंदला समर्थन देणार नसल्याने आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळण्याची लेखी मागणी पालघर पोलीस ठाण्यात केली होती. त्या पाशर््वभूमीवर शुक्रवारी सकाळी वंचितच्या वतीने शहरातील दुकाने बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याने सकाळी २ ते ३ तास शहरातील दुकाने, रिक्षा बंद होत्या.याच दरम्यान नागरिकत्व कायद्याचे समर्थक असलेल्या भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढून जय श्रीरामच्या घोषणा देत बंद असलेली दुकाने उघडण्याचे आवाहन केल्याचे दिसून आले. या वेळी जय मोदीच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडते की काय असा प्रसंग निर्माण झाला होता. मात्र पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कुठलेही गालबोट न लागता ११-१२ नंतर शहरातील सर्व दुकाने उघडली गेली. वसई तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय गट एकत्र येऊन आंदोलनात उतरले होते, त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी सामाजिक व धार्मिक संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनात सामील झाले होते. व्यापारी वर्गानी बंदला चांगला प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. या प्रसंगी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.जय श्रीरामच्या घोषणाजिल्ह्यात शांततेने बंद करण्यात यावा यासाठी वंचितच्या वतीने पोलिसांसह विविध संघटनांच्या युनियन, शिक्षण समिती यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु पालघर जिल्हा व तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून हातात तिरंगा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. तसेच दुकानदारांना ‘डरने की कोई बात नही’ असे आवाहन केले.

टॅग्स :palgharपालघरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक