शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

भोईरांची चौकशी पूर्ण करा!

By admin | Updated: July 29, 2016 02:52 IST

वसई विरार महापालिकेच्या सहायक आयुक्त स्मिता भोईर यांनी अनधिकृत बांधकाम अधिकृत ठरवून केलेल्या गैरव्यहाराप्रकरणी सुरु असलेली विभागीय चौकशी

विरार : वसई विरार महापालिकेच्या सहायक आयुक्त स्मिता भोईर यांनी अनधिकृत बांधकाम अधिकृत ठरवून केलेल्या गैरव्यहाराप्रकरणी सुरु असलेली विभागीय चौकशी तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. वसई तालुक्यातील मालोंडे येथील सर्व्हे क्रमांक ८१२ येथील लेबो निनस बिल्डींग, कोळीवाडा येथे मजिद कुरेशी व फरीद अली सय्यद या विकासकांनी महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम केल्याची फिर्याद सहायक आयुक्त स्मिता भोईर यांनी दिनांक १३ आॅगस्ट २०१४ रोजी वसई पोलीस ठाणे येथे केली होती. त्या फिर्यादीवरून संबंधित इसमांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फिर्यादी स्मिता भोईर यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक १४ आॅगस्ट, २०१४ रोजी संबंधित इमारती अनधिकृत नसून आरोपींनी कागदपत्र सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करू नयेत असे वसई पोलिसांना कळविले. फिर्यादी स्मिता भोईर यांनी पोलिसांना पुराव्यापोटी एकही कागदपत्र सादर केलेला नाही, पोलिसांना तपासात सहकार्य न करता पोलिसांची दिशाभूल करण्याचा व माहिती दडपण्याचा प्रयत्न केला होता.या प्रकरणी पोलिसांची फसवणूक केल्याची फिर्याद शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांनी दिल्यानंतर वसई पोलीस ठाण्यात स्मिता भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आणि राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी स्मिता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर स्मिता भोईर यांच्याविरोधात आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम अधिकृत ठरवून केलेल्या गैरकारभाराप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम, १९७९ अन्वये विभागीय चौकशी सुरु केली आहे. निवृत्त अधिकारी अ.द. कीर्तने ती करीत असून अंतिम टप्प्यात आली आहे.ही चौकशी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका यांना विधानपरिषदेत दिले आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्यासह हेमंत टकले, किरण पावसकर, राहुल नार्वेकर, ख्वाजा बेग, नरेंद्र पाटील या सदस्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित करून या प्रकरणास विधिमंडळात वाचा फोडली. यावर दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही चौकशीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)काय होते नेमके प्रकरण ?- आधी इमारती ठरविल्या अनधिकृत- पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची सूचना- इमारती अधिकृत असल्याचे सांगून गुन्ह दाखल न करण्याची सूचना- इमारतींच्या अधिकृतते बाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत.