जव्हार - बुधवारी दुपारी १२.०० वा. शासकिय विश्रामागृह जव्हार येथे सर्वपक्षीय सभा घेऊन राजकिय कामासाठी शासकिय इमारतीचा वापर केल्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करावा अशी तक्रार जहिर शेख यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी आचार संहिता लागू झाली असल्यास राजकिय पक्षांचे फलक, वाहनांवरील पक्षांचे चिन्ह, तसेच शासकिय कामकाजात अडथळे आणल्यास त्यांचेवर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानुसार वरील सभेचे वृत्त विविध वृत्त पत्रांत प्रसिद्ध झाले असून त्याची कात्रणेही तक्रारी सोबत जोडण्यात आली असून उपस्थितांवरही कारवाई करण्याची मागणी जव्हार प्रतिष्ठानचे मुस्लिम आघाडी अध्यक्ष जहिर (बबला) शेख यांनी केली आहे. दरम्यान या निवडणूकीचे मतदान वादग्रस्त ई.व्हि.एम. मशीन द्वारे होणार असून निवडणूका पार पडण्याकरीता योग्य नियोजन आखण्यात आल्याचे जव्हारचे मुख्याधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते यांनी सांगितले. तसेच मतमोजणीही २६ मे २०१७ रोजी आदिवासी भवन येथे होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)
आचारसंहिता भंग केल्याची जव्हारमध्ये तक्रार
By admin | Updated: April 30, 2017 03:50 IST