शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हप्तेखोर वाहतूक पोलिसाची तक्रार

By admin | Updated: April 12, 2017 03:56 IST

एका वाहतूक पोलिसांनी मागितलेल्या हप्त्याचा प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर वसईत पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे

वसई : एका वाहतूक पोलिसांनी मागितलेल्या हप्त्याचा प्रकार लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर वसईत पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी लोकमतचे भरभरून कौतुक केले. तर माजी आमदारांनी थेट गृहमंत्र्यांकडेच तक्रार करून भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलीस नारायणे चौगुले यांनी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी वामन शेळके यांच्याकडे मागितलेल्या हप्त्याचे संभाषण लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर आज दिवसभर वसई विरार परिसरात वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचीच चर्चा होती. माजी आमदार डॉमणिक घोन्सालवीस यांनी लोकमतच्या बातमीचे कात्रण जोडून गृहमंत्री आणि पालघर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केलीआहे. हप्ता मागणाऱ्या पोलीस हवालदारावर कारवाई करण्यात यावी आणि भ्रष्टाचार दूर करावा अशी मागणी घोन्सालवीस यांनी केली आहे. नालासोपारा शहरात सर्वाधिक बोगस रिक्शा आणि बेकायदा मॅजिक रिक्शा धावतात. याप्रकरणी एका रिक्शा युनियनने तक्रार केली होती. त्यावेळी वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेकायदा वाहतूक करणाऱ्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्याशी सदर रिक्शा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मला दरमहा ७५ हजार रुपये द्या आणि बाकीचे तुम्ही वाटून घ्या, असा सल्ला दिल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर रिक्शा युनियनच्या पदाधिकाऱ्याने दिली. एकंदरीत लोकमतच्या बातमीने वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी दूर व्हावी आणि रिक्शाचालकांची दादागिरी, मनमानी मोडीत निघावी इतकीच माफक अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)