शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोविड ट्रेनमधील रुग्णांचा रेल्वे स्थानकात संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:05 IST

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चारशे बेड क्षमतेची कोरोना केअर कोच ट्रेन पालघर रेल्वेस्थानकात उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेनमध्ये उपचार घेण्यासाठी पाच-सहा दिवसांपासून काेरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत.

पालघर : पालघर रेल्वेस्थानकात पश्चिम रेल्वेकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभ्या असलेल्या कोरोना केअर ट्रेनमध्ये दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा रेल्वे फलाटावरील मुक्त संचार कोरोना पसरविण्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकत असल्याने याला वेळीच आवर घालण्याची मागणी केली जात आहे.केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चारशे बेड क्षमतेची कोरोना केअर कोच ट्रेन पालघर रेल्वेस्थानकात उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेनमध्ये उपचार घेण्यासाठी पाच-सहा दिवसांपासून काेरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. या रेल्वे कोचमधून हे रुग्ण थेट प्लॅटफॉर्मवर व रेल्वेच्या परिसरात फिरत असल्यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांत पालघर ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. रुग्णवाढ थांबत नसल्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची कमतरता भासत होती. अतिगंभीर असलेल्या रुग्णांना असे बेड प्राप्त होत नसल्यामुळे त्यांना जिल्ह्याबाहेरची वाट धरावी लागत होती. त्यातच काही रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना पालघर जिल्ह्यात घडल्या आहेत.देशात विविध ठिकाणी दिलेल्या कोविड ट्रेनप्रमाणे पालघर जिल्ह्यासाठी कोरोना केअर कोच ट्रेन मिळावी, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. जिल्ह्याचे खा. राजेंद्र गावित यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून ट्रेन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने त्या अनुषंगाने निर्णय घेऊन पालघर जिल्ह्यासाठी ही ट्रेन दिली. या ट्रेनमध्ये सुमारे चारशे रुग्ण एकाच वेळी उपचार घेऊ शकतील, अशी त्याची रचना आहे. ही ट्रेन सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी असली तरी त्यात ऑक्सिजनची सुविधा आहे. 

खबरदारीची सूचनारुग्णांच्या हलगर्जीपणामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक रेल्वे कोचच्या बाहेर पडून प्लॅटफॉर्मवर फिरत असल्यामुळे इतर सामान्य रेल्वे प्रवाशांना त्यांच्यापासून बाधा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी सूचना डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेचे सहसचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसVasai Virarवसई विरार