शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
4
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
5
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
9
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
10
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
11
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
12
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
13
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
14
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
15
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
17
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
18
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
19
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
20
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

वसई-विरारसह सर्व प्रवासीवर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 12:09 AM

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन सेवेचे लोकार्पण :  कोरोनाकाळापासून वसईत बंद होती बससेवा

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार महापालिका हद्दीतील प्रवाशांसह इतरही प्रवासीवर्गास उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याकरिता पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच बुमसेवा देणारी कदाचित वसई-विरार महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचे सांगत खऱ्या अर्थी आजच्या दिवशी महापालिकेच्या वतीने अधिकृतपणे लोकार्पण झाले आहे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत केले.ते पुढे म्हणाले की, आम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशात विकासकामांची उद्घाटने करतो, तर विरोधक हे रात्रीच्या अंधारात उद्घाटन करतात, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी बविआला लगावला. एवढेच नाही तर ही परिवहन सेवा नागरिकांसाठी आहे, यात आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण आणत नाही. खरे तर यामध्ये सर्वांनी सहभागी होणे गरजेचे होते, मात्र ठीक आहे. बुम पद्धतीने सुरू झालेल्या या परिवहन सेवेचा आर्थिक भार पालिकेवर अजिबात राहणार नाही, तर यानंतरही अजून १५० बसेस येतील. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आदींना सवलत आहेच, मात्र महापालिका व त्याच्या परिवहन विभागातर्फे यापुढेही नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.वसई-विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नगरविकास मंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर अखेर शहरात बसेस धावू लागल्या. या प्रसंगी पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, पालिका आयुक्त गंगाथरन डी., शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, आमदार श्रीनिवास वनगा, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अविनाश जाधव यांना वसई न्यायालयाच्या आवारातच रोखले : पोलिसांना मिळाली होती गुप्त खबरn वसई-विरार महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी २ वाजता परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा साजरा होताना दोघा मनसैनिकांनी कार्यक्रमस्थळी गुपचूप प्रवेश मिळवत, अचानकपणे आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली आणि या सोहळ्याला गालबोट लागले, तर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी वसई न्यायालयाच्या आवारातच रोखून धरले होते.n परिवहनसेवेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मनसेकडून गोंधळ घालण्यात येईल, याची गुप्त माहिती पोलिसांना आधीच मिळाल्यानंतर सर्वत्र वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, तरीही  दोन मनसेचे कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून कार्यक्रमात गेले व व्हायला नको तो प्रकार घडला. त्यावेळी प्रसंगावधान राखत शिवसैनिक व तुळींजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्या दोघांची धरपकड करत त्यांना तुळींज पोलीस ठाण्यात नेले.n जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले की, आयुक्त गंगाथरन आम्हाला वेळ देत नाहीत. आठ महिने झाले, वसईत १५ लाख चौरस मीटर भागावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही वेळ मागत आहोत आणि इतका पोलीस बंदोबस्त करूनही मनसेच्या आंदोलनाचा धसका घेत, मला वसईचे डीसीपी व एसीपी यांनी वसई कोर्ट परिसरातच कार्यक्रम संपेपर्यंत उभे ठेवले. तरीही आमचे दोन वाघ आत शिरून राडा केला. त्यांच्या कर्तृत्वावर गर्व आहे, असे सांगून पोलिसांनी आमच्या मनसैनिकांना घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहिली आहे, त्यांचाही लवकरच समाचार घेऊ.