शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
5
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
6
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
7
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
8
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
9
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
11
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
12
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
13
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
15
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
16
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
17
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
18
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
19
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
20
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच

वाड्याच्या रंगीबेरंगी गोधड्यांची परदेशात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:02 IST

तानसा खोऱ्यातील गोर गरीब महिलांना रोजगार मिळावा म्हणून एका परदेशी महिलेने वाडा तालुक्यातील निंबवली येथे सुरू केलेल्या हस्तकला केंद्रातील गोधड्या,

- वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तानसा खोऱ्यातील गोर गरीब महिलांना रोजगार मिळावा म्हणून एका परदेशी महिलेने वाडा तालुक्यातील निंबवली येथे सुरू केलेल्या हस्तकला केंद्रातील गोधड्या, कापडी पिशवी, पर्स, शाल आदींना विदेशात प्रचंड मागणी आहे. येथे अनेक कापडी वस्तू बनविल्या जात आहेत. व त्या परदेशात विकल्याही जात आहेत. या रंगीबेरंगी व आकर्षक वस्तूंना तेथे भरपूर मागणी असून भावही चांगला आहे. आठ ते दहा हजार रु पयांत एक गोधडी विकली जाते. त्यामुळे वाड्याची गोधडी सातासमुद्रापार गेली असून ती लोकिप्रय होत आहे. जेनेटा मोनोसेफ या महिलेने १९८६ साली नित्यानंद एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टद्वारे तिने हे हस्तकला केंद्र सुरू केले. यात कापडी चिंध्यापासून गोधडी, शाल, पर्स, बॅगा, जॅकेट, पायपुसण्या, कपड्याची मनीची माळ, पिशव्या, हार, झिगझॅग डबे, मोबाईल पाऊच, टोप्या, उशांची कव्हरे, वारली पेंटींग्ज यांचे उत्पादन केले जाते. त्यापैकी वस्तू ८० टक्के परदेशात विकल्या जातात. मागणीनुसार मालाचे उत्पादन केले जाते. विशेष म्हणजे गोधड्या या रंगीबेरंगी असून आकर्षक असतात. गोधडीची डिझाईन या केंद्रातील महिलाच ठरवतात. साधारणपणे ९० बाय १०० किंवा ११० बाय ११५ इंच आकाराची गोधडी बनवली जाते. एका गोधडीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. या कलात्मकतेला परदेशात चांगली व सातत्यपूर्ण मागणी आहे.चाळीस महिलांना रोजगारया हस्तकला केंद्रात परिसरातील सुमारे ४० महिला कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी चार पाच जणी अपंग असूनही त्या येथे कार्यरत आहेत. गरीब महिलांना रोजगार देणे हाच खरा उद्देश या केंद्राचा असल्याचे संस्थापक संचालिका जेनेटा मोनोसेफ यांनी सांगितले. त्या व त्यांचे पती हे या केंद्रात विना मानधनावर काम करतात. या केंद्रात ना नफा ना तोटा या तत्वावर वस्तू विकल्या जातात. चिंध्या, वस्तू, शिलाई खर्च व मजुरी यांचा हिशोब करून त्याची रक्कम ठरवली जाते असे जेनेटा यांनी सांगितले. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; चार विद्यार्थी दत्तक : हस्तकला केंद्राबरोबरच तज्ज्ञ असलेल्या मार्गदर्शकाकडून शेतीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाते. ते तंत्र कसे वापरावे, उत्पादन कसे काढावे याची माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते. याचबरोबर या परिसरातील ३२ विद्यार्थाना दहावी ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या संस्थेकडून दिली जाते. चार गरीब मुले या संस्थेने दत्तक घेतली आहेत. येथील शाळांत दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. गेल्या ३१ वर्षात नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट तानसा खो-यात विविध उपक्र म राबवित आहेत.