शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोसबाड येथे नारळ मित्र कार्यशाळा

By admin | Updated: January 30, 2017 01:27 IST

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नारळ मित्र कार्यशाळेचे आयोजन कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते.

अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डीपालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नारळ मित्र कार्यशाळेचे आयोजन कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. या वेळी नारळ पिकावरील रोग तसेच शिडीद्वारे झाडावरून फळं काढणी यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, नारळ बोर्डाचे प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे यांनी मार्गदर्शन केले. पालघर जिल्हयातील जमीन, हवामान व पाणी नारळ पिका करिता पोषक असल्याने १९७० हेक्टर क्षेत्रावर वेस्ट कोस्टल टॉल या जातींची लागवड करण्यात आली आहे. या झाडांपासून प्रतीहेक्टर सुमारे ५८ लक्ष फळं मिळतात. विशेषत: किनारी भागात हे प्रमाण अधिक आहे. काही वर्षांपासून एरियोफाइल्ड माईट (अष्टपाद कोळी) या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नारळाच्या झाडांची स्वच्छता ठेवल्यास अनेक रोगांचा संसर्ग टाळता येऊ शकतो. मजुरांची घटती संख्या आणि मजुरीचे वाढते दर ही बागायदारांसाठी मोठी समस्या आहे. शिवाय उंच झाडांवर चढणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. त्यामुळे या क्षेत्रात यांत्रिकीकरण आवश्यक बनले आहे. त्यामुळे नारळ विकास बोर्ड आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्र यांनी संयुक्तपणे नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन २३ ते २८ जानेवारी या काळात केले होते. या वेळी नारळ लागवड, पाणी व खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आदि माहिती देण्यात आली. या शिवाय शिडीद्वारे नारळाच्या झाडावर चढून फळे काढणी, झाडाची स्वच्छता आदि प्रात्यक्षिके नारळ विकास बोर्डाचे रूपेश तांबडे व दर्शना खोत यांनी शेतकऱ्यांना दाखविले. माहीम येथील प्रगतिशील शेतकरी अनंत राऊत यांच्या नारळ बागेतील सराव सत्रात विशेषत: महिला शेतकऱ्यांनीही १५ ते २० फुट उंच झाडावर चढाई केली. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी कुमारवेल यांच्या हस्ते वीस प्रशिक्षणार्थींना झाडावर चढण्याची शिडी, मार्गदर्शन पुस्तिका तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील विलास जाधव, अनुजा दिवटे, भरत कुशारे, उत्तम सहाणे, अशोक भोईर आदि शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.