शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सीएम तुमचा सवरांवर भरोसा नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:34 IST

वनगा यांच्या मृत्यूनंतरच्या राजकीय हालचाली झाल्या त्यालाही सवराच जबाबदार असल्याचा मतप्रवाह बनला आहे

जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून भाजपामध्ये जोरदार ईनकमिंग सुरू आहेच तर बाकी सर्वच पक्ष आपआपल्या परीने प्रचार करीत आहेतच मात्र या सगळ्या एक गोष्ट प्रामुख्याने चर्चिली जात आहे ती म्हणजे आदिवासी विकास व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा या सगळ्या प्रक्र ीयेत बॅकफूटवर असून पालघरात मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील लोकांच्या हातात संपूर्ण प्रचार यंत्रणा गेली आहे. भाजपाला पाठींबा दिलेल्या श्रमजीवी संस्थापक विवेक पंडीत आणि निलेश सांबरे यांचे भाजपात सध्या सवरा पेक्षाही जास्त चालत असल्याचे बोलले जात असून विशेष म्हणजे आजवरचे सर्व मोठे प्रवेश थेट मुख्यमंत्र्याच्या सोर्सनेच झाल्याने मुख्यमंत्री तुमचा सवरांवर भरोसा नाय काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.खुद्द मुख्यमंत्र्यांनी पालघरात अधिकच लक्ष घातले आहे विशेष म्हणजे हे करताना फडणविस यांनी पालघरात स्थानिक भाजप लोकप्रतिनिधीवर विशेष करून सवरा यांच्यावर अविश्वास दाखविला आहे कारण याठीकाणी प्रत्येकगट गणात विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सक्रीय आहेत याशिवाय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार किसन कथोरे संजय केळकर भिवंडीचे खासदार कपिल पाटील आमदार मनिषा चौधरी पासून विवेक पंडित कोकण मंचचे निलेश सांबरे अशी सर्व टीम कामाला लावली असून यांचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी आहे.वनगा यांच्या मृत्यूनंतरच्या राजकीय हालचाली झाल्या त्यालाही सवराच जबाबदार असल्याचा मतप्रवाह बनला आहे अशा परीस्थितीत त्यानां समोर आणने जिकरीचे बनु शकते हे समजून उमजूनच मुख्यमंत्र्यानी आपली टीम याठिकाणी कामाला लावली असून ही पोटनिवडणुक जिंकण्यासाठी सवरांना थोड बाजूला सारावे लागले हे खरे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018