शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यापासून टॉवर बंद, मोबाइल नोट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:47 IST

डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.तालुक्यातील आदिवासी भागातील सायवन येथे सात वर्षांपूर्वी परिसरात गावासाठी मोबाईल टॉवर उभारण्यात आला. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सदर टॉवर सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात येणारी सायवन, चळणी, गांगोडी, निंबापूर, बांधघर, बापुगाव, शेणसरी, रामपूर, किन्हवली, दिवशी, दाभाडी या गाव पाड्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मोबाईल फोन नोट रिचेबल तसेच सर्वच आॅनलाइन सह आरोग्य सेवा व बँकिंग सेवेवरही परिणाम झाला आहे.सायवन येथे बँक आॅफ महाराष्ट्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी बँकांच्या शाखा आहेत. बँकांचे सर्व व्यवहार इंटरनेटमार्फत होतात. मात्र नेट नसल्याने बँकांचे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. आर्थिक व्यवहारासाठी दररोज ग्राहकांच्या रांगा सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यं लागतात. वृद्ध, निवृत्ती वेतन धारक, महिला, विद्यार्थी, तासन तास रांगेत टाळकत उभे राहतात. कधीतरी पहिल्या दिवशी नंबर लागत नसल्याने. दुसऱ्या दिवशी पुन्हा फेºया माराव्या लागतात. त्यामुळे ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात सतत वाद होतात.सायवन येथे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत पंधरा गावे येतात. या परिसरातील संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असून येथील नागरिक आरोग्य सेवेसाठी पूर्णपणे सायवन आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. मात्र गंभीर परिस्थितीत सर्पदंश, गर्भवती महिला अशा वेळी १०८ सारख्या रुग्णसेविका सेवेशी संपर्क करता येत नाही. तसेच परिसरातील शाळेतील शिक्षकांना वेळोवेळी विविध माहिती आॅनलाईन पाठवावी लागते. मात्र नेट नसल्याने मोठी अडचण होते. त्या साठी त्यांना दररोज पाच सहा किमी नेटवर्क असलेल्या भागात यावे लागते.सायवन येथील ग्रामस्थांना निकडीच्या वेळेस गावापासून एक किमी पुढे उंच टेकडीवर जावे लागते. परंतु दरवेळेस रात्री अपरात्री येथे जाणे शक्य नाही. त्यामुळे तात्काळ मोबाईल टॉवर सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.सायवन भागात सहा महिन्यांपासून दूरध्वनी सेवा बंद आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होते.- रमेश मोरे, सायवन

टॅग्स :Vasai Virarवसई विरार