शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

श्री सदस्यांची जिल्ह्यात ७० विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:00 IST

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालघर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची झळ बसली असताना सरकारी यंत्रण तोकड्या पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही स्थिती उघड असतांना जिथे अनेकांनी पाणी विक्रीची दुकानदारी सुरु केल्याचे विदारकता दिसत असतांना जिल्ह्यातील तब्बल ६५० श्री सदस्यांनी विविध तालुक्यातील ७० विहिरी श्रमदानाद्वारे स्वच्छ करुन जनसामान्य व सेवाभावी संस्थांना एक वस्तूपाठ आखुन दिला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पाणी टंचाईची मोठी झळ पोचल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात कोसो मैलाची पायपीट करावी करावी लागत असल्याने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत विहीर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाद्वारे शेकडो विहीरीमधील गाळ काळण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळत असताना गावागावातील विहिरी आणि बोअरवेल मध्ये गाळ साचत पाण्याचे स्त्रोत्र बंद झाले होते. याचा परिणाम आदिवासी बहुल भागासह शहरी भागातही पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. त्यामुळे पाण्या अभावी नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करण्याच्या विचाराने धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पाऊल उचलण्यात आले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या विचारातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबिर,प्रौढ साक्षरता, व्यसन निर्मुलन, समाजातील घटकांवर मार्गदर्शन आणि मदत कार्य, पाणपोई व्यवस्था, स्वच्छता अभियान विहीर स्वच्छता अभियान जलपुनर्भरण अभियान अशा अनेक उपक्र मांतून समाज सेवा चे कार्य देशभरात अखंड चालू आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहून महाराष्ट्र शासनामार्फत २००८ मध्ये डॉ. नानासाहेब तथा (नारायण) धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष तीर्थरूप आप्पासाहेब तथा (दत्तात्रेय) धर्माधिकारी यांना केंद्र शासनाद्वारे २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.- विविध गावांमधून दि. ३० मे, बुधवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून अभियानाला सुरूवात करण्यात आली. पालघर जिल्ह्यांमधून एकूण ७० विहिरीमधून ओला १८.१९५ टन व सुका १.८२५ टन गाळ काढण्यात आला. हे अभियान पालघर जिल्ह्यातील सफाळे, विराथन, पालघर, बोईसर, नवापूर, तारापूर, चिंचणी, केव, कांदरवन, कोरे, मासवण, नावझे, शिरगाव, मुरबे, मनोर, डहाणू. धाकटी- डहाणू, नागझरी, उंबरगाव, सातपाटी, वडराई, केळवे, अशा विविध गावांमध्ये ६५० श्री सदस्यांनी या उपक्र मात सहभागी होत स्वत: विहिरीत उतरून स्वच्छता केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार