शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शहर एसटीबंदचा विद्यार्थ्यांना फटका, कुडकुडत्या थंडीत रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:17 IST

एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.

वसई : एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. परिवहनची बस न आल्याने दीड तास थंडीत कुड़कुडत उभे राहिलेले विद्यार्थी कंटाळून घरी परतले. त्यामुळे विद्यार्थी एक दिवस शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.वसई पश्चिम पट्टयातील हजारो विद्यार्थ्यांसाठी पहाटे सहा पासून एसटी महामंडळ शालेय बस सेवा देत असे. मात्र, या मार्गावर परिवहन सेवा बस सुरु करीत असल्याने वाहतूक बंद करीत असल्याचे पत्र एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी मंगळवारी प्रांताधिकाºयांना दिले. प्रत्यक्षात मात्र वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा दिली नाही.निर्मळ, भुईगाव, गास, गिरीज आणि परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी सेंट अँथोनी कॉन्व्हेंट हायस्कूल कोळीवाडा, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वसई, सेंट थॉमस ज्युनियर कॉलेज पापडी आणि सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता एसटीची शालेय बस सेवा होती. पण, प्रांताधिकाºयांसमोर झालेल्या बैठकीत परिवहनच्या प्रतिनिधीने सकाळची शालेय बससेवा सुरु करू असे आश्वासन दिल्याने एसटीने बुधवारी सकाळपासून बससेवा बंद केली. मात्र, परिवहनने शालेय बस सेवा दिली नाही.वसईतील २१ मार्गावरील एसटी बंद करण्याच्या महामंडळाच्या निर्णयावर जनहित याचिका अंतिम सुनावणी दरम्यान ७ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने २१ मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना प्रवास करतांना कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता एसटी महामंडळ आणि महापालिका परिवहन सेवा या दोघांना संयुक्तपणे वाहतूक सेवा देणे बंधनकारक आहे असा आदेश दिला होता. त्यानंतर महामंडळाने २१ मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात महापालिका परिवहन सेवा देण्यास तयार आहे असे जाहिर करण्यात आले होते. परंतु, परिवहनच्या अपुºया सेवेचा फटका प्रवासी सहन करीत असताना आता विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे, असा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. बुधवारी विद्यार्थ्यांचे झालेले शालेय नुकसान आणि मनस्तापाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल जनआंदोलन समितीने विचारला आहे. एक दोन दिवस परिवहन आणि एसटीचा ताळमेळ बघू मग जनता, रस्त्यावर उतरतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला एसटी आणि महापालिका जबाबदार असेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप