शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराची सीआयडीकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:36 IST

शासनाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत तालुक्यातील बहुचर्चित पाडाळे धरणाच्या कामामध्ये झालेल्या

मुरबाड : शासनाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत तालुक्यातील बहुचर्चित पाडाळे धरणाच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी सीआयडी खात्याकडून चौकशी सुरू झाल्याने अधिकारी तसेच ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील सरळगावजवळील पाडाळे गावाजवळ भामखोर नदीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या कर्जत उपविभागीय कार्यालयाच्या अधिनस्त धरणाचे काम पूर्ण झाले. हे काम पूर्ण करत असताना ठेकेदाराने धरण क्षेत्रातील टेकड्या, मोठे दगड, मातीचा भराव तसेच ठेवल्याने पाणीसाठवणूक क्षमता ही प्रस्तावित क्षमतेपेक्षा कमी आहे.या धरणाच्या कामाची अंदाजपत्रकीय मूळ प्रशासकीय मान्यता १९८३-८४ मध्ये एक कोटी ७२ लाख १४ हजार एवढी होती. ती वाढत जाऊन २०१६-१७ पर्यंत ९३ कोटी ९२ लाख २३ हजार एवढी झाली. त्याचप्रमाणे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आणखी १० कोटींची तरतूद केली गेली.या कामासाठी अधिकाºयांनी ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे हा निधी वाढवत नेल्याचा आरोप शेतकºयांकडून वारंवार होत गेला. कालव्याचे काम सुरू करण्यापूर्वी अधिकाºयांनी २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार शेतकºयांच्या जमिनी संपादन करून त्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम अदा करून नंतरच कालव्याचे काम सुरू करावयास हवे होते. परंतु, तसे झाले नाही. याबाबत, शेतकºयांनी तहसीलदार आणि मुरबाड पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या.यानंतरही कर्जतउपविभागीय अभियंत्यांनी कालव्याचे काम सुरू झालेले नसतानाही २०१३-१४ च्या हंगामात शेतकºयांनात्यांच्या जमिनीत पाणीसिंचन करण्यासाठी गावच्या सरपंच आणि पोलीस पाटलांना नोटिसापाठवून बैठका घेण्याबाबत सुचवले. बैठका मात्र झाल्या नाहीत. बैठका झाल्याचा सरपंचांचा अभिप्राय घेऊन खोटी बिले काढली गेली.याबाबत, पत्रकार संतोष गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आझाद मैदान येथे उपोषण केले. फक्त मंत्रालयातील अधिकाºयांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर, चौकशी समिती नेमली. परंतु, चौकशीपलीकडे शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. याबाबत, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि आ. जगन्नाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सीआयडीला निर्देश दिल्याने सीआयडी खात्याने चौकशी सुरू केली आहे. यातून दोषींवर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार