शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेव, चकली, चिवडा, शंकरपाळी : नाताळच्या फराळातून साधतोय एकोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:41 IST

आजही वसईत केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकाराबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनविले जात आहेत.

वसई : पोर्तुगीजांच्या राजवटीत जी काही धर्मातरे झाली त्यात वसई-विरारमधील ख्रिस्ती समाज प्रामुख्याने येतो. सोळाव्या शतकापासून जर का इतिहास पाहिला तर मराठ्यांनी मिळविलेल्या विजयानंतरही मराठा सैन्य नाताळ निमित्त वसई किल्ल्यामध्ये घोडेस्वारी करून सलामी देत असे. धर्मातरे झाली पोशाख बदलले मात्र संस्कृती तसेच खाद्य संस्कृतीचा वारसा आजही वसईत पाहण्यास मिळत आहे. म्हणूनच आजही वसईत केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकाराबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनविले जात आहेत. मित्रवर्गाकडून दिवाळी निमित्ते आलेल्या फराळाची परतफेड नाताळच्या काळात ख्रिस्ती बांधव करीत असतात.वसईतील ख्रिस्ती परिसरातून जर का आपण फेरफटका मारला तर आपलयाला घरोघरी रोषणाई, खिडकीला किंवा दारासमोर लावली चांदणी, ख्रिस्त जन्म देखाव्याबरोबर या सर्व सुगंधी पदार्थांचा घमघमाट सुटलेला अनुभवण्यास मिळेल.वसईचा ख्रिस्तीसमाज हा धर्माने जरी एकत्र बांधला गेला असला तरी आपल्या बोलीभाषा व संस्कृती प्रमाणे दोन भागात ओळखला जातो. वसई पश्चिम पट्टयÞात असलेला ख्रिस्ती समाज ‘वाडवळ’, तर विरार व नालासोपारा पश्चिम भागात राहत असलेला समाज ‘कुपारी’ म्हणून ओळखला जातो. गिरीज, तमतलाव या भागात वळकर , म्हणजेच गोवेकर समाज मागील अनेक पिढ्या इथे राहत आहे. याच्या जेवण बनविण्याची पद्धत तसेच फराळातही आपल्याला बराच फरक दिसून येतो.  

टॅग्स :Christmasनाताळ