शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात मुलाचा मृत्यू

By admin | Updated: November 18, 2016 06:32 IST

नालासोपारा जवळील धानीव बाग येथील विहीरीत आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला

विरार : नालासोपारा जवळील धानीव बाग येथील विहीरीत आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. कर्ज न फेडल्यानेच सावकाराने मुलाला विहीरीत फेकून मारल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला.सोमवारी रात्री सूरज रामभजन चौहान (८) या मुलाचा मृतदेह धानीव बाग येथील विहीरीत सापडला होता. सूरजचे वडील रामभजन भाजीविक्रेते असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी धंदा करण्यासाठी नगीनदास पाडा येथील सावकाराकडून आपल्या घराच्या तारणावर ५० हजार रुपये व्याजाने घेतले. हि रक्कम त्यांनी ३ महिन्यात परत करत घराचे तारण ठेवलेले अ‍ॅग्रिमेन्ट परत मागितले. पण सावकाराने सापडत नसल्याचे कारण देऊन कागदपत्रे दिली नाहीत. दरम्यान रामभजनने परत २० हजार व्याजाने घेतले होते. धंद्यात मिळालेल्या पैशातून त्याने आपले घर बांधले.२० हजार रुपयांसाठी सावकाराने रामभजनच्या मागे तगादा लावला होता. सावकाराने वीस हजारावर चक्रवाढ व्याज आकारून अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावरून दोघांत वाद झाला होता. परवा संध्याकाळी सावकाराने घरी जाऊन रामभजनला मारहाण केली आणि त्याचे सर्व सामान रस्त्यावर फेकून घराला कुलूप लावले. काल संध्याकाळी रामभजन आणि त्याची पत्नी मदतीसाठी फिरत होते. त्यावेळी सावकार रामभजनच्या घरी गेला होता. रामभजनच्या दोन मुली आणि सूरज घरी होते. सावकाराला पाहून त्या मुली लपल्या. खेळत असलेला सूरज अचानक गायब झाला. मुलींनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. रात्री शेजारच्या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. ज्या विहिरीत सुरजचा मृतदेह सापडला त्या विहिरीला पत्र्याचे कुंपण आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर तपास वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)