शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील कारखान्यांत बालकामगार, तलासरीतील मुलींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:57 IST

तलासरी भागात रोजगाराच्या संधी कमी असून येथे असलेले कारखाने राजकारण्यांच्या साठमारीत बंद पडले आहेत.

सुरेश काटे -तलासरी :गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान,  वापी तसेच केंद्रशासित दादरा नगर हवेलीतील कारखान्यांत तलासरी, डहाणू तालुक्यांतील बालकामगार मोठ्या प्रमाणात काम करतात. यामध्ये प्रामुख्याने तरुणींचा समावेश असून त्यांच्या आर्थिक  व शारीरिक शोषणाकडे स्वतःला आदिवासींचे पुढारी म्हणणाऱ्यांचे तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

तलासरी भागात रोजगाराच्या संधी कमी असून येथे असलेले कारखाने राजकारण्यांच्या साठमारीत बंद पडले आहेत. त्यामुळे येथील कामगार मोठ्या संख्येने गुजरात राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशातील कारखान्यात कामाला जातात; पण महाराष्ट्रातून गेलेल्या कामगारांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. कामाचा भरवसा नाहीच; पण आर्थिक आणि शारीरिक शोषणाला त्यांना सामोरे जावे लागते, पण याची दखल  कोणीच घेत नाही.

गुजरात राज्यात  तसेच केंद्रशासित प्रदेशातील कारखान्यात संघटना नाहीत. येथील कारखान्यात ठेकेदाराकडून कामगार लावले जातात; पण या ठेकेदाराकडून कामगारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते; पण ठेकेदाराच्या तसेच कारखानदाराच्या विरुद्ध बोलले तसेच मनासारखे वागले नाही तर कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवली जाते. तेथील शासकीय यंत्रणा कारखाना मालकांची बाजू घेते आणि गुन्हा अत्याचार गुजरात राज्यात घडत असल्याने महाराष्ट्रातील यंत्रणाही काही करू शकत नसल्याचे सांगून हात वर करते. 

कोरोनाच्या काळात येथील शाळा, कॉलेज बंद होते. त्यामुळे येथील अल्पवयीन मुली मोठ्या संख्येने गुजरात राज्यातील कारखान्यात कामाला गेल्या. 

खासगी वाहनात कोंबतात दाटीवाटीने गुजरात राज्यात कामाला जाणाऱ्यांसाठी वाहतुकीची साधने नसल्याने खासगी वाहनाने जावे लागते. या खासगी वाहनांत  प्रमाणापेक्षा जास्त कामगार भरले जातात. एकेका वाहनात पंधरा ते वीस कामगार मुली दाटीवाटीने भरल्या जातात. गुजरात राज्यात जाणाऱ्या अल्पवयीन मुलींना कोण न्याय मिळवून देणार? आपल्याकडे अनेक संघटना, महिला आयोग आहेत. महिला कमिट्या आहेत, पण गुजरात राज्यात जाणाऱ्या महिला-मुलींचे आर्थिक व शारीरिक शोषण कोण थांबवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातLabourकामगार