विरार : नालासोपारा पूर्वेला एव्हरशाइन येथील एका इमारतीच्या आवारात खेळत असलेल्या ५ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाकाने लैंगिक अत्याचार केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही मुलगी इतर मुलांसह इमारतीच्या आवारात खेळत होती. सुरक्षारक्षक किशोरीलाल हिम्मतरामने (७१) तिला केबिनमध्ये नेऊन अश्लील चाळे केले. हा प्रकार, एका महिलेने पाहिल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला बलात्कार व अन्य गुन्ह्याप्रकरणी अटक केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार
By admin | Updated: February 18, 2017 04:23 IST