शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

चिकूला पीक विम्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:59 PM

पावती जपून ठेवा; अनेक फळांची बागायत असल्यास प्रत्येकाच्या क्षेत्राची विगतवारी करा

बोर्डी : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना या मृगबहाराकरीता चिकू फळाला लागू करण्यात आला आहे. यावेळी विमा हप्ता हेक्टरी २७५० रू. इतका व विमा संरक्षित रक्कम ५५,००० रू.असून विमा रक्कम भरलेली पावती जपून ठेवण्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी बागायतदारांकरिता आयोजित बैठकीत दिली.शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरल्यानंतर तो मंजूर झाल्यास हा हप्ता बँकेत जमा होतो किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. शिवाय बँकेचेही सहकार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कर्जदार व बिगर कर्जदार दोन्ही वेगळे असून कर्जदार शेतकºयांचा विमा हप्ता बॅँक परस्पर वसूल करून घेते. फक्त खात्री करून घ्यावी, बॅँंक खाते चालू असले पाहिजे, सातबारावर तीन-चार नावे असतील तर स्वयंघोषणा पत्रात ती नमूद करणे आवश्यक, विमा हप्ता भरल्यावर मेसेज प्राप्त होण्यासाठी मोबाईल नंबर नमूद करावा, असे बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी पुष्पेंद्रसिंह बजाज यांनी सांगितले.काशिनाथ तरकसे जिल्हा अधीक्षक, पालघर हे प्रमुख मार्गदर्शक या बैठकीस उपस्थित होते. विमा हे उत्पादन साधन होवू नये. तर संरक्षण म्हणून विचार करावा. स्वयंघोषणा पत्र चुकीचे होऊ नये असे ते म्हणाले. शेतकºयाच्या एकाच क्षेत्रात चिकू, आंबा, नारळ पीक असते अशावेळी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून क्षेत्राची विगतवारी करणे आवश्यक असून त्यामुळे प्रत्येक पिकाच्या विम्याचा लाभ घेणे सोर्यीचे होते. यावेळी लाभार्थी शेतकरी, बँक, विमा कंपनी यांच्या जबाबदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.बागायतदारांनी विगतवारी कशी करावी?एकाच क्षेत्रात चिकू, आंबा, नारळ पीक असते. तर उदा.- १:०० हेक्टर क्षेत्रात आंबा,चिकू,नारळ असेल तर ०.३० हे आंबा, ०.२० हे. नारळ व ०.५० हे. चिकू असे सातबारावर नमूद करावे.