शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिखले विजयवाडीत गुंडांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:18 IST

चिखले गावातील अनुसूचित जातीच्या विजयवाडी वस्तीत शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चप्पल गोळा करून विहिरीत आणि दगडगोटे सार्वजनिक शौचालयात टाकले. एका महीलेच्या घराच्या खिडकीचे नुकसान करून तिला बाहेर येण्यास भाग पाडले.

बोर्डी - चिखले गावातील अनुसूचित जातीच्या विजयवाडी वस्तीत शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चप्पल गोळा करून विहिरीत आणि दगडगोटे सार्वजनिक शौचालयात टाकले. एका महीलेच्या घराच्या खिडकीचे नुकसान करून तिला बाहेर येण्यास भाग पाडले. तिने प्रतिसाद न दिल्याने तिच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ते चार-पाच तास भयानक असल्याची प्रतिक्रिया वस्तीतील नागरिकांनी दिली. दरम्यान रविवारी घोलवड पोलसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला.शनिवारीवारच्या मध्यरात्री चिखले गावात वीज खंडित झाली होती. या दरम्यान काही समाजकंटकांनी विजयवाडी वस्तीतील चार-पाच घरांच्या ओट्यावर ठेवलेल्या चप्पला गोळा करून, त्या लगतच्या सार्वजनिक विहिरीत फेकल्या आणि विहिरीनजीक मानवी मैलाही टाकण्यात आला. त्यानंतर काही घराच्या ओट्यावर वाळत घातलेले शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे गणवेश, महिलांचे कपडे एकत्रित करून एका घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत कोंबले. एवढ्यावरच न थांबता सार्वजनिक शौचालयात केरकचरा, दगडगोटे टाकण्यात आले. एका महिलेच्या घराची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तो अपयशी ठरला. नंतर त्यांनी पंचवीस वर्षीय महिलेच्या घराला टार्गेट केले. तिचा पती परगावी असून ती दोन मुलांसह राहते. तिच्या घराच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवाय तिला घराबाहेर येण्यास सांगण्यात आले. तिच्या घराच्या छपरावरील कौले काढून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. नंतर त्यांनी घरावर दगडफेकही केली.

टॅग्स :Crimeगुन्हाVasai Virarवसई विरार