मनोर : मनोर पालघर रस्त्यावर पडलेले खड्डे मुख्यमंत्री येणार म्हणून शासकीय यंत्रण खडबडून जागी झाली असून दोन दिवसात मलमपट्टी करून रस्ते चकाचक करण्याची मोहिम सुरु झाली आहे.पावसाळा गेला उन्हाळा सुरू झाले तरी मनोर पालघर रस्त्यावर मनोर गाव व इतर ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. अनेक वेळा रस्ते दुरु स्तीसाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यास लेखी तक्रार केली काही लोकांनी आंदोलन केली तरी सुद्धा कोणत्या ही प्रकारची दखल घेतली गेली नाही. गणपती बाप्पा व मोहरमची मिरवणूक त्या खड्ड्यातून काढण्यात आली.मुख्यमंत्री पालघरला येणार म्हणून दोन दिवसात पडलेले खड्डे भरण्याचे काम जोमाने सुरू असून एका दिवसात मनोर बाजार पेठ मनोर बस स्थानकातील काम पुर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्यावरचे खड्डे भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:38 IST