वसई : मुख्यमंत्र्यांची प्रतिमा दहन करण्यात सहभाग नसतांनाही भाजपाच्या एका कार्यकर्त्यांला गोवण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गावे वगळण्याच्या आंदोलनात ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १५ हजारांच्या वैयक्तिक जामीनावर काही जणांची सुटकाही करण्यात आली. मात्र, गावे वगळण्याच्या आंदोलनाशी कोणताही संबंध नसलेल्या आशिष जोशी या भाजपाच्या कार्यकर्त्यावरही याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तालुका माजी सरचिटणीस सुरेश जोशी यांचे जेष्ठ पुत्र आहेत. सुरेश जोशी यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे वाघोलीत आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री प्रतिमा दहन: कार्यकर्त्याला गोवले
By admin | Updated: February 5, 2016 02:32 IST