शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उपवन तलावातील छटपूजा वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:33 IST

आयोजकांमध्ये पडले दोन गट । मनसे घेणार पाण्याचे नमुने

ठाणे : ठाण्यातील उपवन परिसरात शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या आणि रविवारी होत असलेल्या छटपूजेच्या निमित्ताने अयोजकांमध्येच दोन गट पडल्याने अंतर्गत वातावरण चांगलेच तापले होते. यातील एका आयोजक गटाने कृत्रिम तलाव परिसरात पूजा करण्याचा निर्णय घेतला, तर दुसऱ्या गटाने नैसर्गिक तलाव परिसरातच छटपूजेचे आयोजन केल्याने यानिमित्ताने वादंग होण्याची चिन्हे आहेत.

स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून रुद्र प्रतिष्ठानने उपवनच्या कृत्रिम तलाव परिसरात ही पूजा करण्याचा निर्णय घेतला असून या गटाला मनसेनेदेखील पाठिंबा दर्शवला आहे. तर, छटपूजा संस्था ठाणेने पूजेला येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने हा कृत्रिम तलाव अतिशय अपुरा असून त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नैसर्गिक तलाव परिसरातच छटपूजेचे आयोजन केल्याने यानिमित्त दोन्ही गटांच्या वतीने यानिमित्त शक्तिप्रदर्शन केल्याचे समोर आले आहे.ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून उपवन तसेच शहरातील अन्य ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. शनिवारी संध्याकाळपासून या छटपूजेला सुरु वात करण्यात आली असून शनिवारीदेखील ती होत आहे. मात्र, यानिमित्ताने होणारा संघर्ष हा मनसे आणि छटपूजा आयोजकांमध्ये कमी, मात्र तिचे आयोजन करणाºया दोन आयोजकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.उपवन तलाव परिसरात दोन ठिकाणी छटपूजेचे आयोजन करण्यात आले असून एका बाजूला पालिका प्रशासनाने बांधून दिलेल्या कृत्रिम तलाव परिसरात ती होत आहे. या परिसरात रु द्र प्रतिष्ठान आणि ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. दुसरीकडे छटपूजा संस्थेच्या वतीने पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नैसर्गिक तलाव परिसरात सर्व प्रकारची तयारी करून पूजेचे आयोजन केले आहे.रु द्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या छटपूजेचे आयोजक धनंजय सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने जो कृत्रिम तलाव तयार केला आहे, त्याच परिसरात ती होणे योग्य असल्याचे सांगितले.या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून नैसर्गिक तलावालादेखील कोणत्याही प्रकारची बाधा येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सुविधा निर्माण करण्यामध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचेदेखील मोलाचे योगदान असून केवळ नैसर्गिक तलाव परिसरात ही पूजा करणे, ही योग्य भूमिका नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे छटपूजा संस्थेचे आयोजक सुखचंद पाठक यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी येणाºया भाविकांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव परिसरात भाविक मावणार नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत कृत्रिम तलाव मोठा केला जाणार नाही, तोपर्यंत नैसर्गिक तलाव परिसरातच पूजा केली जाणार असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात कोर्टात जाणार असून सह्यांची मोहीमदेखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जलप्रदूषण आढळल्यास तक्रार करणारकृत्रिम तलाव परिसरात छटपूजेचे आयोजन करावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाºया मनसेच्या वतीने पूजा झाल्यानंतर उपवन तलावाच्या पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. यात जलप्रदूषण आढळल्यास याविरोधात तक्र ार करणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी दिली. प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी ऐनवेळी जर पूजेनिमित्त येणाºयांची संख्या वाढली आणि जर कृत्रिम तलावाचा वापर न करता उपवन तलावात प्रदूषण करणारे घटक टाकले गेले, तर मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे