शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:20 IST

या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

पालघर : गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीआयडी) पूर्ण करीत न्यायालयासमोर १० हजार ८७६ पानांचे आरोपपत्र ठेवले. या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी आपल्या गुरूच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) असे दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. चोर किंवा आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यास आल्या असल्याच्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाला राजकीय अथवा धर्माचा रंग न देण्याचे आवाहन करत पालघर पोलिसांकडून तपास काढून सीआयडीकडे सोपविला होता.

या प्रकरणात तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यावर ‘स्लॅक सुपर व्हिजन’चा ठपका ठेवीत त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे, एक उपनिरीक्षक आणि अन्य ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ४० कर्मचाºयांच्या तात्काळ बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. यानंतर कासा पोलीस ठाण्याचा कारभार कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सिद्धवा जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नवी मुंबईच्या कोकण भवन येथील गुन्हे अन्वेषण विभागाने हे प्रकरण २१ एप्रिल रोजी हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पवार आणि इरफान शेख यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी प्रथम या प्रकरणाचे व्हिडीओ, फोटो, आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते. या हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२, ३०७ आदी विविध कलमान्वये आपत्ती निवारण कायदा २००५ चे कलम ५१ (ब) ५२, ५४, साथरोग नियंत्रण कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ व ५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१)(३) १३५ व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमअन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. २१ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाने हाती घेतल्यानंतर ८४ दिवसांच्या तपासानंतर बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८०८ संशयितांची चौकशी केली असून १०८ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.अफवेमुळेच घडले हत्याकांडदोन विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी १२६ आरोपींविरोधात ४,९५५ पानांचे आरोपपत्र तर दुसºया गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी शेख यांनी ही १२६ आरोपींविरोधात ५९२१ पानांचे आरोपपत्र डहाणू न्यायालयापुढे बुधवारी दाखल केले. या हत्याकांड प्रकरणी तपास करणाºया पोलिसांवर दगडफेक आणि सरकारी कामात हस्तक्षेप प्रकरणी अन्य एक गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. हत्याकांड प्रकरणी दाखल आरोपपत्रात तिघांचे झालेले हत्याकांड हे धार्मिक हेतूने झाले नसून एका अफवेच्या प्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयापुढे मांडल्याची माहिती पुढे येत आहे.या हत्या मुले पळविण्याच्या अफवेमुळेच झाल्या, हे आता आरोपपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तपास पूर्ण होण्याआधीच काहींनी या घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. कोरोना साथीचे संकट असूनही ‘सीआयडी’ पथकाने नेटाने तपास करून वेळेत आरोपपत्र सादर केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Courtन्यायालयpalgharपालघर