शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसई परिवहनचा संप बेकायदा, आमदार हितेंद्र ठाकूरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:35 IST

या महापालिकेच्या परिवहन कामगारांनी सुरु केलेला संप बेकायदेशीर असून प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. संपावर कोणताच तोडगा निघत नसल्याने कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे.

वसई : या महापालिकेच्या परिवहन कामगारांनी सुरु केलेला संप बेकायदेशीर असून प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. संपावर कोणताच तोडगा निघत नसल्याने कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे जनतेचे हाल सुरुच आहेत.दहा बडतर्फ कामगारांना तात्काळ कामावर घ्या, यामागणीसाठी विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी कामगार संघटनेने बेमुदत काम बंद सुरु ठेवले आहे. यावर आयुक्त तोडगा काढायला तयार नाही. तर ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी ठेका सोडत असल्याचे पत्र महापालिकेला देऊन तडजोड करणार नाही, असेच दाखवून दिले आहे. गेल्या नऊ दिवसात सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने संपावर कोणतेही भाष्य केले नाही. पण, मंगळवारी आमदार हिेतेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी अचानक पत्रकार परिषद बोलावली. त्यामुळे आमदारद्वयी संपाबाबत ठोस घोषणा करतील अशी पत्रकारांची अपेक्षा होती. पण, आमदार ठाकूरांनी संप बेकायदा असल्याचा आरोप करून संपकरी श्रमजीवी संघटनेला दोष दिला. संपात ज्यांचा संबंध नाही अशा आदिवासी महिलांना बाहेरून आणले गेले आहे. त्या महिला अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याचा धाक दाखवून संप बळजबरीने रेटून नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.बडतर्फी मागे घेण्याचा निर्णय झाला असतांना विश्वाघात केल्याने संप पुन्हा सुरु झाला. आजपर्यंत एकाही पदाधिकाºयाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. कामगाराच्या व्यथा आणि नागरीकांची सोय समजून घ्या. तोडगा काढण्यात पुढाकार घ्या. सहकार्याचा हात मी जाहिरपणे पुढे करीत आहे, असे प्रति आवाहन संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी आमदार ठाकूरांना केले आहे.10 कामगारांना बडतर्फ करण्यात आले असले तरी त्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. पण, त्यासाठी कायदेशीर चौकशी पूर्ण होणे गरजेचे आहे. पण, दिशाभूल करून संप चिघळवण्यात येत असल्याचा आरोपही आमदार ठाकूर यांनी केला आहे. तर संपकºयांनी लोकांच्या हितासाठी संप मागे घेऊन काम सुरु करावे, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी यावेळी केले.