शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

भाजपापुढे जागा राखण्याचे आव्हान; विकासाची पाटी कोरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:50 IST

तीन विधानसभा मतदारसंघांत तालुका विभागल्याने झाले दुर्लक्ष

- वसंत भोईरवाडा तालुका दोन लोकसभा तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला गेल्याने तालुक्याला दोन खासदार, तीन आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकून दोन खासदार विजयी केले. तर भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाचे आमदार निवडून दिले. मात्र, दोन खासदार तीन आमदारांचा हा तालुका पोरका असून त्याला कोणीही वाली नसल्याने तालुक्याची विकासाची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे भाजपावर तालुक्यातील मतदारांचा नाराजीचा सूर असून आगामी निवडणुकीत त्याचा फटका दोन्ही खासदारांना बसेल असे चित्र दिसत आहे.तालुक्यात एकूण ८६ ग्रामपंचायती असून १६५ गावे व दोनशेहून अधिक पाडे समाविष्ट आहेत. त्यातील भिवंडी लोकसभेत ११९ मतदान केंद्राचा समावेश आहे. पालघर लोकसभेत ४६ मतदान केंद्र समाविष्ट आहेत. आगामी निवडणुकीत २०१४ च्या निवडणुकी सारखी मोदी लाट नसल्याने चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत वाडा तालुक्यातील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर वर्षभरापूर्वी वनगांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे खासदार राजेंद्र गावित हे विजयी झाले असले तरी या भागातील विकास कामे करण्यात त्यांनाही अपयश आले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत वाड्याच्या मतदारांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या शांताराम मोरे , विक्र मगड विधानसभेत विष्णू सवरा व शहापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्या पारड्यामध्ये मत टाकून तीन वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांना निवडून दिले होते.२०१४ च्या भिवंडी ग्रामीण लोकसभेच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा १,०९,४५१ लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या एका तुल्यबळ नेत्याला उमेदवारी देणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाल्याने भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.समस्या आणि अपेक्षांचे ओझेतालुक्यातील सिंचन व्यवस्थेकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी वर्ग नाराज असून कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात सुद्धा त्यांना अपयश आले आहे. कृषी वर आधारित उद्योगधंद्यांना चालना देण्यात अपयश आले आहे.वाडा-भिवंडी महामार्गाची दुरावस्था रस्त्यावरील अपघातात शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत. तसेच, तालुक्यातील उद्योगधंदे स्थलांतरित व रोजगाराचा प्रश्न गंभीर आहेत.दृष्टिक्षेपात राजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात पसरलेली लाट आता ओसरली असल्याने भाजपा आणि काँग्रेस यांच्यात कडवी लढत होणार आहे. भाजपाने शिवसेनेसोबतकेलेला संघर्ष आज युती झाली असली तरी त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कडवी झुंज झाली यात शिवसेनेने भाजपाला अस्मान दाखवले होते. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला हरवत काँग्रेसने मिळवलेला मोठा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला होतावाडा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने पालकमंत्र्यांच्या कन्येला पाडून वाड्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते. वाडा पंचायत समितीत भाजपाने राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेची फळे चालल्याने शिवसैनिकात चांगलाच रोष आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघर