शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराबाबत केंद्र सरकार बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:57 IST

बंदरविरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला यश

हितेन नाईकपालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध आणि त्यासाठी वाढवण संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटना देत असलेली कायदेशीर लढाई यामुळे केंद्र शासन बॅकफूटवर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या  प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदविल्यावर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर करून आपले आदेश मागे घेतल्याची माहिती वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे नरेंद्र नाईक यांनी दिली.वाढवण बंदर निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने चंग बांधला आहे. असाच एक प्रयत्न करताना केंद्र सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश यांच्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करीत वाढवण बंदर विरोधी संघर्षातील हवा काढून वाढवण बंदर उभारणीबाबत मनाजोगते निर्णय घेणे सोपे जाईल, असा डाव  असल्याचे संघर्ष समितीने जाणले होते. ही चाल संघर्ष समिती व मच्छीमार संघटनांनी आधीच ओळखली आणि या नियुक्तीस मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका सध्या प्रलंबित आहे. १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले होते की, डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण स्थापन करावे. हे आदेश लक्षात घेऊन सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण प्रथम स्थापन करून उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. 

सरकारने सुमारे दोन वर्षे नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली नाही. मात्र, २७ ऑक्टोबर २०२० रोजी शासनाने एक आदेश निर्गमित करून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याचे अतिरिक्त मुख्य किंवा प्रधान सचिव नगर विकास खाते यांची नियुक्ती करण्याची तरतूद केली होती. या बदलाविरोधात समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  सुनावणीवेळी समितीच्या वकिलांनी या फेरबदलास विरोध दर्शवला. 

टॅग्स :palgharपालघरGovernmentसरकार