शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कठोर परिश्रमांच्या शिकवणीतून मिळाली करिअरची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 00:13 IST

सर्वसामान्य मुलगा ते पोलीस अधीक्षक हा टप्पा गाठणाऱ्या गौरव सिंग यांना कशामुळे मिळाली प्रेरणा?

पालघर : शिकण्यापेक्षा मैदानी खेळाकडे माझा जास्त कल. त्यामुळे शाळा - कॉलेजमध्ये एक सर्वसाधारण मुलगा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असताना घरात त्यांनी एसपी (पोलीस अधीक्षक) बनावे हे वडिलांचे स्वप्न! इंजीनिअरिंगपर्यंत पोचल्यानंतर शिक्षणाचा पुढचा मार्ग खडतर बनू पाहत असताना अनेक संकटावर मात करीत जगण्यासाठी संघर्ष करणाºया एका व्यक्तीवर आधारित ढ४१२४्र३ ङ्मा ँंस्रस्र्रल्ली२२ या सत्य घटनेवर आधारित चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि जगण्यासाठी करावा लागणाºया संघर्षाचे वास्तव मला पटले. यूपीएससी परीक्षा पास करायची असेल तर कठोर परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाली आणि यातूनच पोलीस अधीक्षक गौरव सिंग यूपीएससी परीक्षा पास झाले.अनेक संकटावर मात करीत जगण्यासाठी संघर्ष करणाºया ख्रिस गार्डन या नायकावर आधारित ‘परस्युएट आॅफ हॅप्पीनेस’ हा चित्रपट मी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात पाहिला आणि याने माझी मानसिकता संपूर्णपणे बदलून गेली. विविध समस्यांवर मात करीत जगण्यासाठी स्वत:चे रक्त विकून शेवटी यशस्वी होणाºया ख्रिसच्या व्यक्तिरेखेने मी चांगलाच प्रभावित झालो. जे लोक आयुष्यात काही करू शकत नाहीत ते नेहमीच आपले मनोधैर्य खच्ची करत असतात. त्यामुळे ‘जी स्वप्ने तू पाहिली आहेस, ती तुलाच पूर्ण करावी लागतील’. या ख्रिसने आपल्या मुलाला दिलेल्या शिकवणीतून मलाही धडा मिळाला आणि मी माझ्या वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाहीवडील पोलीस खात्यात सबइन्स्पेक्टर पदावर कार्यरत असल्याने आपल्या मुलाने पोलीस अधीक्षक बनावे ही वडिलांची इच्छा. मात्र यूपीएससी परीक्षा पास करायची असेल तर अभ्यासात कठोर परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव मला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात झाली. त्यानंतर मात्र मी आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करण्यात अजिबात कसर सोडली नाही.लखनऊच्या कुशीनगर सरकारी शाळेतून माझा शिक्षणाचा प्रवास सुरु झाला. सिटी मोंटेसरी शाळेतून माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवताना दहावी परीक्षेदरम्यान यूपीएससी परीक्षा देऊन पोलीस सेवेत जायचे ध्येय मी निश्चित केले. पुढे इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. वर्गात एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून माझी गणना होत होती. मात्र, शिकण्यापेक्षा मैदानी खेळ आणि व्यायाम याकडे माझा विशेष कल होता.शिक्षकांपासून दोन हात लांबशिक्षकांबद्दल मनात नितांत आदर असला तरी शिकण्यापेक्षा मला मैदानावर खेळणे अधिक पसंत होते. पण ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे अनेक शिक्षक समजावून सांगत असत. त्यांच्याकडून वारंवार मिळणारी ही शिकवण योग्य असली तरी खेळाकडे जास्त कल असल्याने मला ती त्रासदाय वाटायची आणि मी शिक्षकांपासून दोन हात लांब राहणेच पसंत करायचो. शाळेत माझे एकमेव आवडते शिक्षक म्हणजे पिटीचे सर बी.बी. सिंग.आपली स्वप्ने आपल्यालाच पूर्ण करावी लागतात

टॅग्स :Vasai Virarवसई विरार