शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळाचा फटका पर्यटनाला; भूकंपाच्या धक्क्यांचाही होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:06 IST

यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी दिल्या पर्यटनस्थळाला भेटी

हितेन नाईकपालघर : ‘क्यार’ चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या ‘महा’ चक्रीवादळासोबतच जिल्ह्यात एकावर एक बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर बसत असून यंदा केवळ १५ टक्के पर्यटकांनी केळवे तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्याने या व्यवसायाचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. पर्यटकांच्या मनात वाढत चाललेली ही भीती भविष्यात पर्यटन व्यवसायाला मारक ठरू शकते.

जिल्ह्याला ११० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून रेल्वेची साखळी, चांगले रस्ते अशी उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था, राहण्याची उत्तम सोय, उत्तम पर्यटन स्थळे आणि प्रदूषणविरहीत समुद्र किनारे असल्याने दरवर्षी पालघर जिल्ह्यातील झाई, बोर्डी, डहाणू, केळवे, जव्हार, अर्नाळा आदी भागात मुंबई, गुजरात राज्यातील हजारो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. जिल्हा प्रशासन पातळीवरूनही येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

नवरात्रोत्सव संपला की कॉर्पोरेट कंपन्यांचे ग्रुप, महिला मंडळे, पुरूष ग्रुप यांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे वळतात. तर दिवाळी संपली की आपल्या मुलाबाळांसह शेकडो कुटुंबे केळवे, अर्नाळा, कळंब, डहाणू-बोर्डी आदी भागाला भेट देत असतात.अरबी समुद्रांतर्गत अचानक झालेल्या बदलांचा मोठा फटका या वर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्र वारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेगही वाढला असून किनाºयावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत समुद्राचे पाणी गावातील घरात शिरू लागले आहे.

तर डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने पंचविशी गाठली असून मागच्या आठवड्यापर्यंत हे धक्के सुरूच आहेत. ४.८ रिष्टर स्केलपर्यंत या भूकंपाने मजल गाठल्याने याचा धसका पर्यटकांच्या मनात घर करून बसला आहे. त्यामुळे एके ठिकाणी कधीही बसणारे भूकंपाचे धक्के, अवेळी कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे क्यार आणि महा चक्रीवादळाच्या तडाख्याची भीती पर्यटकांना सतावत आहे. मुंबई, नाशिक, वापी, सुरत आदी भागातील पर्यटक अशा धोकादायक बनू पाहणाºया वातावरणाची चौकशी करून येण्याचे टाळत असल्याचे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष आशिष पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पर्यटकांच्या मनातील भीती दूर सारीत त्यांना विश्वास वाटेल, यासाठी सोयीसुविधा उभारायला हव्यात, अशी मागणी होत आहे.केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन : जिल्ह्यात हळुहळू कमी होत चाललेला पर्यटन व्यवसाय टिकून रहात पर्यटकांनी अधिकाधिक या भागातील पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात म्हणून केळवे येथे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे आयोजन ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. ताजे पापलेट, कोळंबी, सुरमई, बोंबील, उकड हंडी आदी खाद्य पदार्थांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आल्याचे कार्यवाह संजय घरत यांनी सांगितले.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ