शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आकर्षक चिन्हांच्या निवडीकडे उमेदवारांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:08 IST

तब्बल १९० चिन्हांच्या पर्यायामुळे उमेदवारांना निवडीसाठी मिळाला पर्याय

- सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्कपारोळ :  लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची आपापली चिन्हे असतात आणि ती मतदारांना ओळखीची असतात. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार वगळता प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला पक्षाचे निवडणूक चिन्ह दिले जाते. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एका पक्षाचे किंवा एका पॅनेलचे उमेदवार असले तरी त्यांना आपल्या प्रभागात वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० नवीन चिन्हांची भर पडली आहे.

   ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असेल तर त्यांना निवडणूक चिन्हेही वेगवेगळी दिली जातात. निवडणूक आयोगाने या वर्षी एकूण १९० चिन्हे उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली होती. वसई तालुक्यात दोन ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी सोमवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. या चिन्हांमध्ये निवडणूक आयोगाने ४० नव्या चिन्हांची भर घातली आहे. त्यामध्ये संगणकाचा माउस, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बिस्कीट, भाजीपाला आदी चिन्हांचा समावेश असल्याने आपल्याला आकर्षक चिन्ह मिळावे याकडे उमेदवारांचा कल असल्याचे दिसून आले.

या चिन्हांचा होता पर्यायn निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, nकंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चश्मा, हॉकी, ईस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली, nफलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर.

वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणारग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभागानुसार उमेदवार उभे असतात. एका प्रभागात दोन तर कधी तीन उमेदवार असतात. त्यामुळे एका पक्षाचे वा पॅनेलचे उमेदवार उभे राहिले तरी त्यांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते. छत्री, शिटी, बॅट, गॅस, छताचा पंखा, चष्मा, बस आदी चिन्हांना पसंतीn या निवडणुकीत राजकीय पक्षांची भूमिका असली तरी त्यांना अधिकृत चिन्हे वापरता येत नाहीत. निवडणूक आयोगाने नव्याने ४० चिन्हांचा समावेश केला असल्याने चिन्हांची संख्या १९० वर पोहचली आहे.  n आकर्षक आणि मतदारांच्या लवकर पचनी पडतील, लक्षात राहतील अशा चिन्हांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित होणारी चिन्हे घेतली असून छत्री, शिटी, बॅट, गॅस, छताचा पंखा, चष्म्या, अंगठी, कंगवा, बस अशी ओळखीची चिन्ह वसईतील उमेदवारांनी घेतली आहेत. n या चिन्हांचा त्यांना किती फायदा होते हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे.