शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पी.टी.ड्रेसची निविदा अखेर रद्द , आदिवासी विकास विभागावर पुरवठादारांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 05:42 IST

आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणा-या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विविध साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. या करीता मे २०१७ मध्ये जव्हार प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळेतील जवळ जवळ १७,५०० विद्यार्थ्यांना पी.टी. ड्रेस पुरवठा करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या.

- हुसेन मेमनजव्हार : आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणा-या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विविध साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. या करीता मे २०१७ मध्ये जव्हार प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळेतील जवळ जवळ १७,५०० विद्यार्थ्यांना पी.टी. ड्रेस पुरवठा करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र अल्प मुदतीच्या निविदा वेळेवर पूर्ण न केल्यामुळे आदिवासी विकास विभागाचे उप सचिव सु.ना. शिंदे यांनी दि. १५ स्पटेंबर २०१७ रोजी शासन निर्णयाच्या ई-निविदांची पायमल्ली करीत चालू शैक्षणिक वर्षात पी.टी.ड्रेस व बेडींग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर प्रति ड्रेस ४०० रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात यावी असे पत्र पाठविल्याने त्याला शासन निर्णय समजून सदर निविदा रद्द करून आॅनलाईन ई-निविदा पॉर्टलवर नुसते रद्दचे पत्र देऊन संपुर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान, या निविदा रद्द करण्याचे कारण संबंधित प्रकल्प कार्यालयाचा असल्याचा आरोप येथील पुरवठादारांनी केला असून आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अल्प मुदतीच्या निविदा काढण्याचा अर्थ असा होतो की, कार्यालयाला संबंधित वस्तूची खुपच गरज आहे, म्हणून तातडीने खरेदी करण्याकरीता सात दिवस अल्प मुदतीची निविदा प्रसिध्द केली होती. मात्र, ही निविदा प्रक्रिया तब्बल ५ महिन्यानंतर म्हणचे सप्टेबर महिन्यात तांत्रिक लिफाफा उघडणे प्रक्रिया करून पुरवठादारांशी चर्चा करून कार्यालयाने नमुना लॅब मार्फत तपासणी करीता. त्यात पात्र पुरवठादारांकडून नमुने घेण्यात आले होते. त्यामुळे जव्हार प्रकल्प कार्यालयाला भा.प्र.से. दर्जा असणारे प्रकल्प अधिकारी असुनही पाच-पाच महिने या महत्वाच्या बाबी रेंगाळून पडत आहेत. त्यामुळे यात दोषी कर्मचारी व अधिकाºयांवर दप्तर दिरंगाई अ‍ॅक्ट नुसार करवाई करण्याची मागणी निविदेत भाग घेतलेल्या पुरवठादार करणार आहेत.जर या निविदा प्रक्रिया वेळेवर पार पाडल्या असत्या तर आदिवासी विभागाकडून तसे पत्र आले असते का? मग विद्यार्थ्यांना वेळेवर ड्रेस मिळत नाही म्हणून डि.बी.टी. (डायरेक्ट बेनिफीशरी ट्रान्फर) हा पर्याय विभागाला सुचला मात्र अद्याप शासन निर्णयातील वेळेनुसार खरेदी का करण्यात आली नाही? याबाबत संबंधित प्रकल्प कार्यालयाला का विचारण्यात आले नाही? तसेच शासन निर्णयात पी.टी. ड्रेस खरेदी करण्याचे अधिकार अप्पर आयुक्तांना देण्यात आले आहेत.मात्र, तरीही शासन निर्णयाची पायमल्ली करीत आपल्या अधिकारात नसतांना प्रकल्प कार्यालयाने या निविदा का काढल्या ? तसेच अप्पर आयुक्त कार्यालयाने पी.टी. ड्रेस खरेदीची प्रक्रिया का पार पाडली नाही? शासन निर्णय होण्या आगोदर प्रकल्प कार्यालय शहापुर यांनी पी.टी. ड्रेस पुरवठा निविदा प्रसिध्द केल्या होत्या.आडमुठी भूमिका अन दफ्तर दिरंगाईनिविदेत भाग घेण्याकरीता कार्यालयाकडून शेकडो अटी व शर्तीचे बोजे टाकण्यात येतात, आणि पुरवठादारा कडून टेंडर फि व निविदेच्या किंमतीच्या एक टक्के अनामत रक्कम लाखो रूपयांमध्ये वसुल केली जात आहे. आणि पोटाची खळगी भरण्याकरीता कार्यालयाकडून लादण्यात आलेल्या या आडमु्ठ्या भुमीकेला पुरवठादार सहन करत आहे.अटी व शर्ती फक्त पुरवठा दारालाच लागु आहेत का ? कार्यालयाकडून दिरंगाई झाल्यावर त्यावर कारवाई होत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच निविदा प्रक्रिया पार पाडण्याकरीता विशिष्ट मुदत ठरविण्यात येत, मात्र येथे कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही म्हणूनच याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Schoolशाळा