शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम गुंडाळली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:35 IST

भंगार झालेल्या गाड्या अजूनही रस्त्यावर; घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक झाले त्रस्त

-राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम ३० जून व २ जुलैला राबवून एकूण ३२८ पैकी केवळ २१५ बेवारस वाहने जप्त केली. दोन दिवस केलेल्या कारवाईनंतर मोहीम थंडावल्याने ती गुंडाळली का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अद्यापही ठिकठिकाणी भंगारावस्थेत वाहने उभी असून त्यावर कारवाई केव्हा होणार, अशी विचारणा होत आहे.अशा वाहनांवर कारवाई करण्याचा ठराव २८ मार्चच्या महासभेत मंजूर झाला होता. या वाहनांचा शोध घेऊन त्यावर नोटीस बजावण्याचे निर्देश प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार, १४ ते १९ जूनपर्यंत एकूण ३२८ बेवारस वाहने शोधून त्यांच्यावर नोटिसा लावल्या.ही वाहने उचलण्यासाठी ३० जूनचा मुहूर्त निश्चित केला. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी भार्इंदर पूर्वेकडील गोडदेव येथील आरक्षण क्रमांक २१९ वरील नागरी सुविधा भूखंडाची जागा ठरवली.या कारवाईसाठी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रभागानुसार सहा पथके तयार करण्याचे आदेश दिले. पथकाने ३० जून तर २ जुलैला केलेल्या कारवाईत ३२८ पैकी नोटीस शाबूत असलेल्या २१५ वाहनांवरच कारवाई करून ते टोइंग करण्यात आले. त्यासाठी तातडीने भाडेतत्त्वावर टोइंग व्हॅन मागवल्या.या कारवाईनंतरही शहरातील काही भागांत भंगारावस्थेतील वाहने उभी असून त्यावर अद्याप जप्तीची कारवाई केलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भंगारावस्थेतील वाहनांच्या आसपास घाणीचे साम्राज्य पसरत आहे. या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.पालिकेने एकूण ३२८ वाहनांवर नोटिसा चिकटवल्या होेत्या. त्यातील ११३ वाहने त्यांच्या मालकांनी परस्पर हटवली. उर्वरित २१५ वाहने जप्त केल्यानंतर १५ वाहने त्यांच्या मालकांनी दंड भरून सोडवली. सध्या जप्त २०० वाहनांची नोंदणी रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्रव्यवहार केला आहे. यानंतरही शहरात बेवारस वाहने असल्यास त्यावरील कारवाईचा अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे.- संजय दोंदे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारीपालिकेने बेवारस वाहनांवर सुरू केलेली कारवाई केवळ दिखाऊपणाची ठरली आहे. आजही ठिकठिकाणच्या वाहतूक रस्त्यांजवळ बेवारस व भंगारावस्थेत वाहने उभी आहेत. पालिकेने किमान भंगार झालेल्या वाहनांवर त्यांचे मालकच अस्तित्वात नसल्यामुळे प्राधान्याने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे.- शान पवार,शहर सचिव, मनविसे

टॅग्स :bhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक