शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बविआची शिट्टी गेली, रिक्षा मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 00:14 IST

बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाबाबत वाद निर्माण झाल्याने आयोगाने ते गोठविले आहे.

पालघर/वसई : बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाबाबत वाद निर्माण झाल्याने आयोगाने ते गोठविले आहे. त्यामुळे ते आता कुणालाही दिले जाणार नाही. आयोगाने बविआला रिक्षा हे चिन्ह दिले आहे. बविआला चष्मा हे चिन्ह मिळावे अशी अपेक्षा होती. परंतु तसे झालेले नाही. शिट्टी हे चिन्ह मिळालेले नसले तरी त्याचा कोणताही विपरीत परिणाम बविआच्या या निवडणूकीतील कामगिरीवर होणार नाही, असे बविआचे सूत्रधार आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिट्टी या निवडणूक चिन्हावरून रात्री १२.३० वाजेपर्यंत रंगलेल्या नाट्यानंतर एकूण २१ पैकी ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १२ जणांमध्ये लढत राहणार आहेत. मात्र मुख्य लढत सेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बविआ, महाआघाडी चे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात रंगणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह गोठविले आहे. अपेक्षित असलेल्या चष्मा या चिन्हाऐवजी रिक्षा हे चिन्ह त्यांना मिळाले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात असल्याने शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चेतन पाटील, अमर कवळे, लुईस काकड, दत्ता सांबरे, प्रमोद मौळे, राजेश पाटील, रोहन वेडगा, विनोद भावर, सचिन शिंगडा या ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र बहुजन महापार्टीच्या एका उमेदवाराने आपल्या उमेदवारी अर्जात खाडाखोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अर्ज मागे घेणे आणि त्याअनुषंगाने मुक्त झालेल्या त्याच्या शिट्टी या चिन्हावर बविआने आपला हक्क सांगणे या वादावर झालेल्या युक्तिवादानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय देणे या सोपस्कारात रात्रीचे १२.३० वाजले. त्यामुळे उमेदवारांची अंतिम यादी त्यांना देण्यात आलेली चिन्हे वाटप करण्यास खूप उशीर झाला.निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार आहेत.>वसई : चिन्ह कोणते मिळेल याची मी चिंता करीत बसलो नव्हतो. त्यामुळे एका दिवसात रिक्षा ही निशाणी माझ्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचवली. रिक्षा-चालक व मालक संघटनांनीही भेट घेऊन रामनवमी उत्सवात प्रसाद व रिक्षा निशाणी घेऊन आमचा सन्मान केल्याची भावना व्यक्त केली,- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर