शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिवाळीनिमित्त खरेदीची धूम, आॅनलाइनवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:47 IST

लहान-मोठ्या बाजारपेठा सजल्या; शहरीभागात आॅफरमुळे रविवारी झाली होती मोठी गर्दी

पारोळ : दिवाळीचा सण जवळ आल्याने वसई, विरार, नालासोपारा, परिसरातील बाजार पेठा साहित्याने फुलल्या असून दिवाळीच्या अधीचा रविवार आल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदी साठी मोठी गर्दी केली होती.सणाची खरेदी हा, जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा कायम असते. दिवाळीच्या निमित्ताने कपडयÞांपासून चीजवस्तूंपर्यंत, धान्यापासून मिठायांपर्यंतच्या खरेदीला एकदम तेजी येते. याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोषणाईचे दिवे यांचा बाजारही भरू लागतो. राहिलंच तर दिवाळसणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फिर्नचर, गाडी यांच्या खरेदीचेही बेत आखले जातात. गेल्या काही वर्षांत रूजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळी निमित्त बाजारात भरणाऱ्या खरेदीच्या उत्साहात भर घातली आहे. त्यात आता आॅनलाइन शॉपिंगची नवलाई अवतरली आहे. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षा अशी व्हर्च्युअल खरेदी स्वस्त असल्याने स्मार्ट ग्राहक आता हा पर्याय निवडू लागले आहेत. विशेषत: तरूणवर्ग त्यास पसंती देत आहे.बाजाराचा नवा कलदिवाळी अधिक देखणी करण्यासाठी आकाशकंदील, पणत्या, दिवे, तोरण आणि विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. आकाशकंदील, पणत्यांचे विविध प्रकार, तोरण, रांगोळीचे स्टीकर बाजारात उपलब्ध झाले आहेत.रांगोळी अधिक सोयीस्करयंदा पांढरी रांगोळी दहा रुपये किलो, तर रंगीत रांगोळी २५ ते ४० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. तसेच विविध १४ प्रकारच्या रंगांमध्ये रांगोळी असल्याने त्यातील गुलाबी, लाल, पोपटी, भगव्या, हिरव्या रंगाच्या रांगोळीला अधिक मागणी आहे.मेणाच्या पणत्यांचा पर्यायदिवाळीत खरे तर परंपरेने तेलाच्या पणत्या लावण्याची प्रथा असते. आता वापरायला सोप्या मेणाच्या दिव्यांनी त्यांची जागा घेतली आहे. मोठ्या रांगोळ्यांमध्ये सजवायला आणि दीपोत्सवांमध्ये हमखास असे मेणाचे दिवे दिसतात.आॅनलाइन बाजारातही तेजीआॅनलाइन शॉपिंग संकेतस्थळांवरून मिळणारी आकर्षक सूट आणि असंख्य प्रकारचे पर्याय यांमुळे आॅनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आता वाढत चालला आहे. तोच कल यंदाच्या दिवाळीत आणखी वाढल्याचे दिसत आहे.दर्जा उत्तम आणि मनाचे समाधानआॅनलाइन पद्धतीमुळे मोठयÞा प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. ५० ते ७५ टक्के सवलत असल्याने वस्तू कमीत कमी दरात मिळत आहेत. वस्तूंच्या दर्जामध्येदेखील कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे ही पद्धत उपयुक्त वाटत आहे.यावर्षी असे आहेत फटाकेपर्यावरण जागरूकता आणि ध्वनीप्रदुषणाबाबतची मर्यादा यांमुळे दणदणाट करणाºया सुतळी बॉम्ब, लवंगी फटाके यांना बाजूला सारून आकाश उजळवून टाकणाºया फटाक्यांची मागणी केली जात आहे.बेन्टेन, छोटा भीम, पॉवररेंजर्सलहान मुलांसाठी आकर्षण असणाºया बेन्टेन, छोटा भीम आणि पॉवररेंजर्स या कार्टूनमधील पात्रांच्या नावाने हे फटाके बाजारात उपलब्ध आहेत. हे फटाके लावल्यानंतर साधारण १२ फूट ते १५ फूटवर जाऊन ते फुटतात.भुईचक्र‘म्युझकिल व्हील’ म्हणजेच ‘चकरी’ चा फटाका. ‘भुईचक्र’ या नावाने हा फटाका सर्वश्रुत आहे.त्यातून शिट्टीचा आवाज बाहेर पडतो.

टॅग्स :Diwaliदिवाळी