शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

बुलेटचे जबरदस्ती भूसंपादन स्थानिकांनी पाडले हाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 00:15 IST

अशिक्षित आदिवासीच्या संमतीपत्रावर सह्या व अंगठे घेत असल्याने हा यंत्रणेचा होत असलेला गैरवापर रोखण्यासाठी भूमि अधिकार आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

- हितेन नाईक पालघर : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेण्याकरता सरकारी यंत्रणा आणि नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन पोलीस बळ, पैसा व गैरमार्गाचा अवलंब करीत असून जमिनी संबंधित नोंदी अद्ययावत करणे, वारस नोंद करण्याच्या नावाखाली तलाठी सह अन्य विभागाची मंडळी फसवणूक करून अशिक्षित आदिवासीच्या संमतीपत्रावर सह्या व अंगठे घेत असल्याने हा यंत्रणेचा होत असलेला गैरवापर रोखण्यासाठी भूमि अधिकार आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.सरकारच्या या नीतीचा अ‍ॅड. ब्रायन लोबो यांनी कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पोलीस बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांंनी हाणून पाडल्यानंतर प्रशासन व प्राधिकरण गावोगावी आपली पथके पाठवून शेतकºयांंची संमती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कामासाठी सरकारने निवृत्त महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्त भूमीअभिलेख अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीने गावातील तरुणांची भरती केली आहे. हेच सारेजण बाधित गावांना भेटी देऊन जमिनी संबंधित नोंदी अद्ययावत करण्याच्या नावाखाली तसेच वारस नोंद करण्याच्या नावाखाली फसवणूक करून संमतीपत्रावर आदिवासींच्या सह्या व अंगठे घेत आहेत. या कामासाठी या तरु णांना अशा प्रत्येक संमतीपत्रा मागे यापूर्वी एक हजार रुपये दिले जात होते त्यानंतर आता ही रक्कम दुप्पट करून दोन हजार रुपयांवर नेण्यात आली आहे.या तरुणांना अशा हजारो रुपयांची आमिषे दाखवून मिहन्याला दिल्या जाणाºयां मानधना व्यतिरिक्त ही रक्कम दिली जात आहे. भूमि अधिकार आंदोलन समितीच्यावतीने सरकार व प्राधिकरणामार्फत पैशाच्या गैरवापराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून या निधीचा स्त्रोत कोणता? यासंबंधीची माहिती प्राधिकरणाने सार्वजनिकरित्या उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. हाय स्पीड रेल्वे प्राधिकरणाने गेल्या तीन वर्षातील त्यांनी केलेल्या खर्चाची माहितीही सार्वजनिक करावी अशी देखील भूमी अधिकार आंदोलन कर्त्याची मागणी आहे. परस्परसंमतीने जमीन घेण्याच्या प्रयत्नांना अत्यल्प यश मिळाल्यानंतर सरकारने आता भूसंपादन कायदा २००३ अन्वये जमीन संपादन केली जाणार असल्याची घोषणा ३१ मे २०१९ रोजी केली आहे.या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्रामसभांची संमती बंधनकारक असल्याने प्रशासनातर्फे संबंधित क्षेत्रात ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पालघर तालुक्यात यानुसार ११ जुलै रोजी झालेल्या ग्रामसभांपैकी एकाही ग्रामसभेने या प्रकल्पाला किंवा प्रस्तावित भूसंपादनाला संमती दिली नाही.डहाणू आणि तलासरी तालुक्यात देखील बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध असल्याचा ठराव सर्व ग्रामसभांनी संमत करून या प्रकल्पाला संमती नाकारली आहे भूसंपादनासाठी ग्रामसभा ची प्रक्रिया राबवताना प्रशासन व प्राधिकरण शेतकºयांंच्या संमतीपत्रावर सह्या घेण्याकरता निवडलेल्या तरुणांना सध्या गावोगावी पाठवले जात आहे.(पान ३ वर)>ग्रामसभांचा कौल विरोधात, जबरदस्ती होत असल्याचा दावापालघर तालुक्यात जुलै मध्ये १३ ग्रामसभा झाल्या असून त्यातील ३ ग्रामसभा तहकूब झाल्या आंबेत.तर उर्वरीत १० ग्रामपंचायतींनी एकमताने विरोध दर्शविला आहे.संमती पत्रावर घेण्यात आलेल्या सह्या ह्या आमची फसवणूक करून घेण्यात आल्याची भूमिका दामशेत आदी भागातील शेतकºयांंनी घेतली आहे.२० जुलै रोजी पालघरच्या उपविभागीय अधिकाºयां समोर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आम्हाला मिळालेल्या घटनात्मक अधिकार आणि ग्रामसभातील ठरवाद्वारे आम्ही विरोध दर्शवूनही आमच्या कडून जमिनी देण्यासाठी जबरदस्ती केली जात असेल तर आम्हाला मिळालेले घटनात्मक अधिकार फक्त कागदावर लिहिण्यासाठीचेच आहेत काय?अश्या जळजळीत प्रश्नांचा भिडमार ह्या बैठकीत होणार आहे.