शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांच्या फायली गायब झाल्या..., नगररचना विभागाची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:43 IST

वसईतील एका बिल्डरच्या चार फायली गायब झाल्याची माहिती मिळाल्यावरून घाबरलेल्या नगररचना विभागाने शोध मोहिम हाती घेतली.

वसई : वसईतील एका बिल्डरच्या चार फायली गायब झाल्याची माहिती मिळाल्यावरून घाबरलेल्या नगररचना विभागाने शोध मोहिम हाती घेतली. त्यासाठी नगरचना विभागातील कर्मचा-यांची झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, शोध मोहिमेत फायली कार्यालयातच पडलेल्या आढळून आल्या. त्यामुळे नगररचना खात्याचा आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी कारभार उजेडात आला.दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मुख्यालयातील नगररचना विभागाचे प्रभारी उपसंचालक संजय जगताप यांना बिल्डरच्या चार फायली गायब झाल्याची माहिती दिली. त्यासरशी त्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, फायली सापडत नसल्याने त्या खरोखरच गायब झाल्याचा संशय बळावला. त्यासरशी जगताप यांनी कार्यालयातील कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. इतकेच नाही तर फायली सापडल्या नाहीत तर गुन्हे दाखल करीन असा इशाराही दिला. त्यामुळे संपूर्ण नगररचना कार्यालय गायब फाईल शोधायच्या कामाला लागले. मात्र, या प्रकारानंतर नगररचना विभागातील अनागोंदी कारभार उजेडात आला आहे. सध्या वसई विरार महापालिका हद्दीत बोगस कागदपत्रे तयार करणारे अ़नेक बिल्डरांवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे फाईली गायब होऊ शकतात अशी भिती अनेकांनी वर्तवली आहे. पण, नगररचना विभाग अद्याप सावध झालेले नाही. नगररचनेचा अभिलेख कक्ष अद्याप अद्ययावत नाही. वसई विरार शहरातील बिल्डरांच्या शेकडो फाईल्स कार्यालयात पडलेल्या आहेत. आरटीआयमुळे फाईल्स झेरॉक्स आणि अधिकाºयांच्या माहितीसाठी वारंवार घेतल्या-ठेवल्या जात आहेत. अनेक फाईल्स विधी सल्लागार तसेच लिगल ओपीनियनसाठी आत-बाहेर कराव्या लागतात. असे करीत असताना त्या पुन्हा जागेवर ठेवल्या जात नाहीत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार