बोईसरची पाणीटंचाई संपणार!; सहा इंचांची नवीन पाइपलाईन व नियोजन ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:52 PM2018-12-31T23:52:37+5:302018-12-31T23:52:49+5:30

ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Boiser's water shortage will end! A six-inch new pipeline and planning will be boasted | बोईसरची पाणीटंचाई संपणार!; सहा इंचांची नवीन पाइपलाईन व नियोजन ठरणार वरदान

बोईसरची पाणीटंचाई संपणार!; सहा इंचांची नवीन पाइपलाईन व नियोजन ठरणार वरदान

Next

- पंकज राऊत

बोईसर : ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या करीता नवीन पाइपलाईन टाकण्यात येत असल्याने या वर्षात बोईसरचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपणार आहे. पूर्वी मधुर हॉटेल पासून ब्ल्यू डायमंड हॉटेल मार्गे मार्केट मधून येणाऱ्या पाईप लाईन द्वारे भंडारा वाडा टाकीमध्ये पाणी साठवण होत होती. या मुख्य लाईनमधूनच सर्व मोठमोठ्या संकुलांना घरगुती पाणी कनेक्शन दिल्याने भंडारवाडयाची पाण्याची टाकी भरत नसल्याने पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करता येत नव्हता यातून मार्ग काढण्यासाठी १० किलो एचडीपीची सहा इंचाची नवीन पाईप लाईन मधुर हॉटेल जवळून बिग बाजार मार्गे एस टी बस स्टँड पासून एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून तिच्यावरून कुणालाही नवीन कनेक्शन दिले जाणार नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक होईल त्यातून इतर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल तसेच नवापूर नाका ते भंडारवाडा या लाईनला सुद्धा संकुलधारक व व्यावसायिक गाळे यांना मुख्य लाईन वरून कनेक्शन दिल्याने भंडार वाड्यात पाणी येत नव्हते या ठिकाणी जुनी लाईन बंद करून दहा किलो एचडीपीची नवीन एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पुरेशा दाबाने भंडारवाडा टाकीमध्ये पाण्याचा साठा मुबलक होणार आहे तर पूर्व भागातून दांडी पाडा टाकीवर योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असतांनाही त्याचा वापर पश्चिम भागात करता येत नव्हता ते पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणण्यासाठी रेल्वे रुळाखालून तीन लाईनी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामुळे बोईसरच्या पश्चिम भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होणार आहे. भंडारवाडा संममध्ये पाणी साठवणूक होणार असल्याने केशवनगरच्या टाकीत पाणी पोहोचून त्या भागातील पाण्याचा प्रश्न प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे तर भविष्यामध्ये ओसवाल किंवा खोदाराम भागात जागा उपलब्ध झाल्यास तीन ते चार लाख लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी बांधल्यास अजून पाण्याचा प्रश्न सुटून सुखकर होईल.
संकुलातील वैयक्तिक कनेक्शन बंद करून सोसायटीला मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून वैयक्तिक बोअरिंगला परवानगी देणे बंद केले आहे.
जुन्या लाईन वर चोरी व अनधिकृत कनेक्शन कळत नव्हते. परंतु आता नवीन लाईन मुळे ती कनेक्शन आपो आप बंद होतील अशा पद्धतिचे नियोजन केले असल्याचे बोईसरचे ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे यांनी सांगून नागरिकांना येत्या वर्षात मुबलक पाणी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

नव्या पाइपलाइन्स होणार अनेक व्हॉल्व्हमुळे दाबाची समस्या सुटणार
भंडारवाडा ते भीमनगर ही जुनी ४ इंच व्यासाची लाईन असून या मुख्य लाइनीवरून संकुलधारक व्यवसायिक घरगुती व इतर ठिकाणी पाणी दिले जात आहे या मुख्य लाईनला नियंत्रणासाठी कुठेही वॉल नसल्याने नागरिकांना पुरेसा व वेळेवर योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता यासाठी भंडारवाडा ते भीमनगर च्या दिशेने ६ इंचाची नवीन पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित असून त्या लाईनवर प्रत्येक भागात वॉल बसवून पुरेशा दाबाने पाणी देण्याचे नियोजन वेळेनुसार आखण्यात आले आहे हे वॉल गोविंद आर्केड, गोसालिया पार्क, खोदाराम बाग, साईबाबा नगर, दिजय नगर, इंद्रप्रस्थ, दलाल टॉवर, भीमनगर येथे बसविण्यात येणार आहेत.

Web Title: Boiser's water shortage will end! A six-inch new pipeline and planning will be boasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.