शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

बोईसरची बाजारपेठ सामग्रीने फुलली

By admin | Updated: January 13, 2017 05:59 IST

मकरसंक्रांतीचा सण अगदी तोंडावर आल्याने लागणाऱ्या विविध साहित्यांनी बाजारपेठा संपूर्णपणे

पंकज राऊत / बोईसरमकरसंक्रांतीचा सण अगदी तोंडावर आल्याने लागणाऱ्या विविध साहित्यांनी बाजारपेठा संपूर्णपणे फुलून गेल्या असून विविध आकाराच्या पतंगांची खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी दुकानांपुढे झुंबड करते आहे. छोट्या मोठ्या आकारातील पतंगावर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र झळकले असून त्या सोबत अच्छे दिन आ गये व महानायक असे लिहिण्यांत आले आहे तर छोटा भीम, स्पायडरमॅन डोरेमन, टॉम अँड जेरी, अँग्री बर्ड, इत्यादी कार्टून तर बाहुबली, सुलतान या चित्रपटांच्या नावांबरोबरच अभिनेते, गरबा नृत्य आणि फुलपांखरांची चित्रे छापण्यात आली आहेत. यातील बहुसंख्य पतंग प्लास्टिकच्या असून त्याची किंमत पांच रूपया पासून पन्नास रूपया पर्यन्त आहे तर पाचशे मीटर मांजाच्या फिरकीची किंमत रुपये१२० आहे हा संपूर्ण माल वापीच्या बाजारपेठेतून आणण्यांत आला असल्याचे दुकानदार सांगतात. मातीची सुगडी, तीळ, भोगीसाठी भाज्या, साधा, चिक्कीचा गूळ, बत्तासे, कुरमुरे, रेवडी, साखर फुटाणे तीळगुळाचे तयार लाडू, वड्या, नारळ,ऊस, बोरे, हळदी कुंकु इ. साहित्य खरेदी साठी महिलांची गर्दी होत आहे नोटबंदीचे आणि पैसे काढण्यावरील निर्बंधांचे सावट सणावर असल्याने गरजे इतकीच खरेदी महिलांकडून केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते.हा सण साजरा केलापौष कृष्ण प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे.ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ घालून भाकरी करतात. मकर संक्र ांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. या सणाला मुली, युवती, महिला नवीन अलंकार घालतात. दुपारच्या जेवणाचा बेतही खास असतो. तीळ घातलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि बाजरीची खमंग खिचडी असा लज्जतदार बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.