शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

बोेगस गुन्हा : रिलायन्स एनर्जी कर्मचा-यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:08 IST

भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या बेकायदा मागण्यांना दाद देत नसल्याने त्याचा राग ठेवत रिलायन्स एनर्जीच्या कर्मचाºयांना ते काम करत असताना बळजबरी गाडीतून पोलीस ठाण्यात

मीरा रोड : भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या बेकायदा मागण्यांना दाद देत नसल्याने त्याचा राग ठेवत रिलायन्स एनर्जीच्या कर्मचाºयांना ते काम करत असताना बळजबरी गाडीतून पोलीस ठाण्यात नेणाºयांविरुध्द गुन्हा दाखल करा. दबावाखाली कर्मचाºयांविरूद्ध गुन्हा दाखल करणारे पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी मुंबई इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनने मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढला. आठवड्याभरात कारवाई झाली नाही तर आज फक्त कांदिवली ते भार्इंदरपर्यंतच्या कर्मचाºयांनी बंद पुकारला आहे. पण नंतर सर्वच भागातील कर्मचारी कामबंद करतील. शहर अंधारात बुडाले तर त्याची जबाबदारी आमची नाही असा इशारा युनियनचे सरचिटणीस व शिवसेना उपनेते विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला.भार्इंदर पूर्वेच्या खारीगाव भागातील जुनी धोकादायक सागर इमारत पाडण्यात आली. तेथील उपकेंद्राला आग लागल्याने नागरिकांनी कळवल्यावर रिलायन्स एनर्जीचे कामगार घटनास्थळी आले. केबल बदलणे आवश्यक असल्याने ते काम सुरू केले होते. तोच सोमवारी सकाळी आमदार नरेंद्र मेहतांनी काम करणारे विक्रमसिंह जाधव, यू.डी. पाटील व दिलीप नाईक या कर्मचाºयांना बळजबरी काम बंद करायला लावत नवघर पोलीस ठाण्यात नेले. तेथून कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर मार्फत गुन्हा दाखल करायला लावला असा आरोप युनियनने केला.मंगळवारी युनियनसह अधिकारी संघटनेने कांदिवली ते भार्इंदरपर्यंतचे सर्व काम बंद ठेवत कार्यालयात सभा घेतली. तेथे नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह यांना निवेदन देऊन मेहतांवर गुन्हा दाखल न केल्यास होणाºया आंदोलनाला आम्ही जबाबदार नाही असे सांगितले. भालसिंह यांनीही चौकशी करून योग्य कार्यवाही करु असे आश्वासन दिले. नंतर महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी मेहता व जानकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. उपनेते गायकवाड यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, युनियनचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अधिकारी संघटनेचे संजय पाटील आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त बी. जी. पवार यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. जानकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. आयुक्तांनीही आठवड्याभरात कार्यवाहीचे आश्वासन दिले.पालिका निवडणुकीत भाजपातून ब्रिजेश सिंह हे सेनेत गेले व निवडणूक लढवली. त्याचा राग धरून मेहता हे रिलायन्स एनर्जीच्या कामगार व अधिकाºयांचा छळ करत असल्याच्या तक्रारी असल्याचे युनियनने म्हटले आहे. या शिवाय पिल्लई नावाच्या सेनेशी संबंधित व्यक्तीसोबतही ते असाच प्रकार करत आहेत. जानकर यांचे दोन भाऊ रिलायन्समध्ये कामाला असून एकाची बदली केली म्हणून जानकरला त्याचा राग असल्याचा दावाही उपस्थिांनी केला. अनेकवेळा तातडीने काम सुरु करावे लागत असल्याने आम्ही नंतर परवानगी घेतो व त्याचे शुल्कही पालिकेला देतो.या कामाबद्दल आम्ही पालिकेला शुल्क भरणार होतो व तसे दंडासह १५ लाख ८४ हजार मंगळवारी भरलेही. पण पालिका व कंपनीचा विषय असताना मेहतांनी आधीचा राग व त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने हा प्रकार केल्याचे युनियनच्या पदाधिकाºयांनी सांगितले.