शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटीतील बोट दुरुस्ती यार्ड, लिलावगृह गेले ‘चोरीला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 00:32 IST

लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार करणार

- हितेंन नाईकपालघर : केंद्रीय कृषी योजनेअंतर्गत सातपाटी येथे मच्छीमार बांधवांसाठी मासेमारी केंद्र विकसित करण्यासह सुविधा पुरवण्यासाठी देण्यात आलेल्या ८ कोटी ४७ लाख ५१ हजार ७३४ रुपयांतून उभारलेली अनेक बांधकामे चोरीला गेल्याची गंभीर बाब ज्येष्ठ मच्छीमार नेते तथा माजी सरपंच सुभाष तामोरे यांनी निदर्शनास आणली आहे. याबाबत आपण लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्रीय कृषी योजनेअंतर्गत सातपाटी येथे ९०० मीटर्सची बार्फ वॉल बांधण्याच्या कामासाठी ५ कोटी ८ लाख, खाडीतील ५३ हजार २०० क्युबिक मीटर्स साचलेला गाळ काढण्यासाठी ८८ लाख ८१ हजार, बोट दुरुस्तीसाठी २० मीटर्स बाय १५ मीटर्स यार्ड बांधण्यासाठी १५ लाख ९२ हजार, ३० मीटर्स बाय २० मीटर्स रुंदीचे लिलावगृह बांधण्यासाठी ९१ लाख ४१ हजार, लिलावगृहासाठी जागा विकसित करण्यासाठी संरक्षित भिंत बांधणे, नाल्याचा मार्ग दुरुस्त करण्यासाठी ७७ लाख ४३ हजार, मच्छीमारांची जाळी विणण्याची शेड उभी करण्यासाठी २२ लाख ४४ हजार, मासे सुकविण्यासाठी ओटा तयार करण्यासाठी १० लाख ८७ हजार आदी कामांसाठी राज्य शासनाच्या सहायक पतन अभियंता कार्यालय, ठाणे या विभागामार्फत एकूण ८ कोटी ४७ लाख ५१ हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले होते. या कामाचा ठेका डहाणू येथील अंकिता इंटरप्रायजेस या ठेकेदाराला देण्यात आला होता. या ठेकेदाराने सोसायट्यांच्या विरोधामुळे लिलावगृह आणि स्थानिक अडचणीमुळे संरक्षक भिंत बांधण्यात आली नसल्याव्यतिरिक्त इतर सर्व कामे अपूर्ण करण्यात आल्याची माहिती सुभाष तामोरे यांनी पतन विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या माहितीतून देण्यात आलेली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची बिलेही ठेकेदाराला अदा करण्यात आलेली असल्याचे कळविले आहे. सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या कामांपैकी अनेक कामांची पूर्तता झाली नसून होड्यांच्या दुरुस्तीसाठी शेड बांधण्यात आली नसून खाडीतील गाळ काढणे, लिलावगृहासाठी जागा विकसित करणे, गटार बांधकामे ही कामे झालीच नसल्याचे सुभाष तामोरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंकिता इंटरप्रायजेसचे ठेकेदार निमिल गोहेल यांच्याशी संपर्क साधला असता पूर्ण अंतिम देयक देणे बाकी असून मला फक्त ६ कोटींची बिले देण्यात आली आहेत. लिलावगृह आणि उघडा निवारा या कामाऐवजी अन्य कामे मत्स्यव्यवसाय विभागाकडे प्रस्तावित करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.ज्या अधिकाऱ्याने काम पूर्ण झाल्याचे वरिष्ठ कार्यालयाला कळवल्याने ठेकेदारांची कोट्यवधींची बिले काढण्यात आली, त्याविरोधात आणि शासकीय निधीची लूट केल्याप्रकरणी आपण पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे तामोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तक्रार करणार सद्यस्थितीत घटना स्थळावर होड्यांची यार्ड दुरुस्ती शेड आदी बाबी पूर्ण करण्यात आली असतील तर ती अस्तित्वात असणे आवश्यक असताना ती दिसून येत नसल्याने या कामाची चोरी कुणी केली? यासाठी आपण तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.