शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना घेऊन जाणारी बोट वैतरणा खाडीत बुडाली; 2 जण गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 07:49 IST

दोन वाहून गेले; २२ जणांना वाचविले, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांमुळे दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/सफाळे : मुंबई-बडोदा महामार्गावर वैतरणा खाडी पूल उभारणीच्या कामावर जाणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या कामगारांची बोट खाडीत बुडाली. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत दोन कामगार बुडाले. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. स्थानिकांच्या मदतीने २२ कामगारांना वाचविण्यात यश आले. 

दुर्घटनेत आदर्श मिश्रा आणि निर्मल शुक्ला हे दोन कामगार खाडीत गेले तर हाफीज उल इस्लाम (४०), सोहेल खान (२१), मासूम शेख (२२) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तहसीलदार रमेश शेंडगे तसेच केळवे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तत्काळ शोधकार्य सुरू केले आहे. मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी व वाडा या पाच तालुक्यांतून जातो. या महामार्गाची लांबी १०७.१३ किलोमीटर इतकी आहे. वैतरणा खाडीत पुलाचे सात खांब उभारणीचे काम जीआर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनी करत आहे.

बोटीत नेमके किती कामगार होते?अपघाताची माहिती मिळाल्यावर उपविभागीय महसूल अधिकारी सुनील माळी, तहसीलदार सुनील शेंडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, केळवे सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी भीमसेन गायकवाड, बंदर अधिकारी नवनीत निजाई, प्रसाद पारकर, सफाळे पोलिस ठाण्याचे निरीक्षक मांदळे आदींनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले होते.ही घटना केळवे सागरी पोलिस आणि वसई सागरी आयुक्तालयाच्या मांडवी पोलिस ठाण्याच्या सीमेवर घडली असूनही मांडवी पोलिस ठाण्याचा एकही जबाबदार पोलिस घटनास्थळी उपस्थित नव्हता. नेमके किती कामगार बोटीत होते, याबाबत जयेश इंटरप्रायजेस या ठेकेदार कंपनीला माहिती नसल्याने कामगारांची संख्या लपविण्याचा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. केळवे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी कामगारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.

 सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रात्रपाळी केलेल्या कामगारांना आणण्यासाठी व २२ ते २५ कामगारांना प्रकल्पस्थळी नेण्यास बोट जात होती. नेहमीची अधिक क्षमतेची बोट बंद पडल्याने कमी क्षमतेची व कामगारांना लाइफ गार्ड न देताच ही बोट जात होती. ओहोटीच्या प्रवाहात वाढीव-वैतीपाडादरम्यान बोट बुडाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :palgharपालघर