शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील अंध, अपंग, गतिमंद मुलांना मिळाला ‘जिजाऊ’चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:52 IST

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या धगधगीत मुशीतून तयार झालेल्या चार विद्यार्थिनी जळगाव येथे यूपीएससी स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करीत आहेत.

हितेन नाईक पालघर : जव्हारमधील गरीब आदिवासी दिव्यांगांची शाळा अचानक बंद पडते आणि सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य संकटात सापडते. त्यांच्या पालकांपुढे निर्माण झालेल्या मोठ्या संकटाची माहिती शिक्षकामार्फत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्यापुढे मांडल्यानंतर अवघ्या २० दिवसांत या दिव्यांगांसाठी झडपोलीमध्ये ओमकार अंध-अपंग व गतिमंद मुलांची निवासी शाळा आकार घेते. आज शाळेतील ६५ विद्यार्थ्यांचे पालकत्व सांबरे यांनी स्वीकारले असून यात ३२ मुले आणि ३३ मुलींचा समावेश आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या धगधगीत मुशीतून तयार झालेल्या चार विद्यार्थिनी जळगाव येथे यूपीएससी स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करीत आहेत.समस्यांनी घेरलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील एका छोट्याशा गावातील एसटी कंडक्टर भगवान सांबरे आणि भावनादेवी यांच्यापोटी जन्मलेले नीलेश सांबरे हे रत्न. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रस्ते उभारणीच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मनोर-वाडा-भिवंडी येथील टोलनाक्यावरील २०१३ च्या आंदोलनानंतर झालेल्या तुरुंगवासात त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला आणि जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेची स्थापना होत सामाजिक कार्याच्या झंझावातातून नीलेश सांबरे हे नाव आज ठाणे, पालघर, कोकणवासीयांच्या तोंडी आहे. स्वकमाईतून सर्वसामान्यांचे दु:ख दूर करण्यासाठी विनामूल्य रुग्णालय, शाळा-महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, दिव्यांगांची शाळा आदी सामाजिक कर्तव्याची व्यवस्था उभी करणारा हा अवलिया आहे तरी कोण? याची चर्चा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या कोकण प्रांतात होऊ लागली आहे. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी हे व्रत नेटाने सुरू ठेवले आहे.