शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

महाआघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 05:32 IST

तिन्ही पक्ष एकत्र येऊ न शकल्याने, काही ठिकाणी त्यांनी परस्पर सहकार्याची; तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील हा विसंवाद भाजपच्याच पथ्यावर पडेल,

पालघर : भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांत महाआघाडी करण्याची घोषणा जरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली असली, तरी पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ न शकल्याने, काही ठिकाणी त्यांनी परस्पर सहकार्याची; तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील हा विसंवाद भाजपच्याच पथ्यावर पडेल, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या नेत्यांनी मात्र आमच्यातील समन्वय उत्तम असून निकालानंतर आम्ही एकत्र येऊ, असा दावा केला आहे.पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. शेवटच्या टप्प्यात काही प्रमुख नेत्यांनी हजेरी लावल्याने आठही तालुक्यांतील राजकीय वातावरण तापले. प्रचारातील एकमेव रविवारी कारणी लावण्यासाठी शेवटच्या दिवशी सभा, धावत्या बैठकांबरोबरच वाहनांवर लाउडस्पीकर लावून दिवसभर मतदारांना आवाहन केले जात होते.या निवडणुकीच्या रणधुमाळीत २१९ उमेदवार आहेत. ५७ जागांपैकी तीन गटांत आणि ११४ गणांपैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. पालघर आणि डहाणू या दोन तालुक्यांत सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे या तालुक्यांचे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राहील, हे स्पष्ट आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यात सभा घेतल्या, तसेच धावते दौरे केले. त्याआधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत महाविकास आघाडीवर, त्यातही खास करून शिवसेनेवर तोफ डागली होती. वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवले, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, फडणवीस यांना नियतीनेच बाहेर बसवले; भाजप जातीय राजकारण करीत आहे, असे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले. एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तसेच आदिवासी भागाचा विकास शिवसेनेनेच केल्याचे सांगितले.वसई तालुक्याबाहेर बहुजन विकास आघाडीला सत्तेत वाटा देण्याची कोणत्याच प्रमुख पक्षाची तयारी नाही. तसेच त्या पक्षाने आधी भाजपला आणि नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचामुद्दाही स्थानिक नेत्यांनी मांडला. त्यामुळे त्या पक्षासोबतही आघाडी झालेली नाही.शिवसेनेचे ज्या तालुक्यांत वर्चस्व आहे, तेथे खास करून विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा वाटा देण्यास तो पक्ष तयार नाही. कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेल्या डहाणू, तलासरीत त्या पक्षाने बविआशी मैत्री कायम ठेवली आहे.काँग्रेसला सर्वच तालुक्यांत प्रचंड झगडावे लागणार आहे. भाजपची भिस्त कुणबी सेना आणि श्रमजीवी संघटनेवर आहे; तर आघाडीच्या नेत्यांनी जिजाऊ संस्थेला सोबत घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच एकसंध आघाडी उभी राहू शकलेली नाही.>पक्षीय बलाबल५७ गटांपैकी भाजप- २१, शिवसेना १६ (एका बंडखोर अपक्षासह), बविआ १०, माकप ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १>तालुकानिहाय लढतींचे चित्रपालघर तालुक्यात १२ गट असून येथे शिवसेनेचे बºयापैकी वर्चस्व आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बविआ, कम्युनिस्ट पार्टी यांचीही चांगली ताकद तालुक्यात आहे. मागील वेळी येथे शिवसेनेने ७, भाजपने ५, राष्ट्रवादीने २, बविआने २, माकपने २ आणि काँग्रेसने १ जागा जिंकली होती. विक्रमगड तालुक्यात पाच गटांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. येथे भाजप आणि सेनेत थेट लढत आहे. अन्य पक्षांचे उमेदवारही आपापल्या परीने लढत देत आहेत. मागील निवडणुकीत येथे भाजपने ४ तर शिवसेनेने एक जागा जिंकली होती. जव्हार तालुक्यात पाच जिल्हा परिषद गटात १४ उमेदवार आहेत. जव्हारमध्ये भाजपचे वर्चस्व असून शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेही चांगले अस्तित्व आहे. मागील निवडणुकीत भाजपने ३, शिवसेनेने १ आणि माकपने १ जागा जिंकली होती. डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ गटांसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असे ६० उमेदवार आहेत. येथे या वेळी मोठी चुरस आहे. मागील निवडणुकीत भाजप ५, राष्ट्रवादी २, बविआ २, कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) २ आणि काँग्रेसने १ जागा जिंकली होती. तलासरीत जिल्हा परिषदेच्या पाच गटांत १९ उमेदवार लढतीत आहेत. या तालुक्यांत भाजप आणि माकपची जवळपास सारखीच ताकद आहे. मागील निवडणुकीत भाजपने ३ तर माकपने दोन २ जागा जिंकल्या होत्या. मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी आसे गटात राष्ट्रवादीचे हबीब शेख, तर पोशेरा गटातून भाजपच्या राखी चोथे यांची बिनविरोध निवड झाली आहे. खोडाळा गटातून सेनेच्या दमयंती फसाळे आणि भाजप यांच्यात सरळ लढत होणार आहे. मागील वेळी राष्ट्रवादीने १, शिवसेनेने १ तर भाजपने १ जागा जिंकली होती. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ गटांतून २३ उमेदवार रिंगणात आहेत. वाडा तालुक्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये कडवी लढत होत आहे. मागील वेळी येथे शिवसेनेने ४ तर भाजपने २ जागा जिंकल्या होत्या. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ जागा असून या तालुक्यात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत बविआने ३, तर शिवसेनेने १ जागा जिंकली होती.