शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची गद्दारी सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:24 IST

उद्धव ठाकरे: पालघरमधील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका

पालघर : भाजपावाले म्हणताहेत बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना उरली नाही माझा त्यांना सवाल आहे भाजपा तरी वाजपेयींच्या काळातली कुठे उरली आहे. त्याकाळी पक्षातील ज्येष्ठांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा मान राखला जायचा. आता तर त्यांना मोडीत काढणारी भाजपा उरली आहे. पैशाचा माज आणि थैली शहा यांच्या तालावर नाचणारी भाजपा बनली आहे. आधी त्याचा विचार करा. बाळासाहेबांनी भाजपाचे अनेक वार, खंजीर सहन केलेत पण मी भाजपाची गद्दारी सहन करणार नाही. जशास तसे उत्तर देणार असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथील जाहीर सभेत दिला.या भाजपाला महाराष्टÑात कुणी विचार नव्हते. शिवसेनेचेच बोट धरून युतीचा आधार घेऊन भाजपा येथे काँग्रेस गवतासारखी वाढली आणि आज त्याच शिवसेनेवर ती दुगाण्या झाडते आहे. पहिल्यांदा जेव्हा वाजपेयींचे सरकार केंद्रात सत्तेवर आले तेव्हा ते किती दिवस टिकेल, हे कुणालाच माहिती नव्हते अशा स्थितीत वाजपेयींचा बाळासाहेबांना फोन आला ते म्हणाले प्राप्त परिस्थितीत मी शिवसेनेच्या फक्त एकाच खासदाराला मंत्रीपद देऊ शकतो. त्यासाठी मला नाव सुचवा. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले की आधी तुम्ही पंतप्रधान होणे व तुमचे सरकार स्थिर होते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.शिवसेनेला एकही मंत्रीपद दिला नाही तरी चालेल, इतरांना खूश करण्यासाठी आमच्या कोट्यातील मंत्रीपदे देऊन टाका. असे आम्ही इमानदान आणि युतीधर्म पाळणारे आहोत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्या सुरेश प्रभुंना, डॉ. भामरेंना घेतले आम्ही थयथयाट नाही केला.वाढवण बंदर आणि जेएसडब्ल्यू जेट्टी विरोधात येथील संघर्ष समिती ५ जूनला मोर्चा काढणार आहेत. त्यात आमचे हजारो शिवसैनिक सहभागी होती अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणतात जर श्रीनिवास पराभूत झाला तर त्याला मातोश्रीचे दरवाजे बंद होतील. परंतु प्रत्यक्षात तो निवडून येणार आणि तुमची खुर्ची जाऊन तुमच्यासाठी दिल्लीचे दरवाजे कायमचे बंद होतील हे विसरू नका, असा टोला त्यांनी हाणला. श्रीनिवास आमच्याकडे आपणहून आला. नुसता नाही सहकुटुंब आला. आम्ही त्याला फोडला नाही. असा दावाही त्यांनी यावेळी केला.तत्परता दाखवली नाहीभाजपाचा दुटप्पीपणा स्पष्ट करतांना ते म्हणाले, की श्रीनिवासची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली तरी भाजपाने जाहीर केले नाही. आणि काल ते निरंजन डावखरे भाजपात दाखल झाले. त्यांची पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी लगेच दाखल केली. ती निवडणूक आहे २५ जूनला आणि उमेदवारी कधी जाहीर २४ मे ला. जी तत्परता डावखरेंच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत दाखविली ती श्रीनिवासची उमेदवारी घोषित करण्याच्या बाबतीत का दाखविली नाही. ५० वर्षे झाली शिवसेनेत एक पक्ष, एक नेता, एक धोरण, एक निशाणी कायम आहे. परंतु भाजपामध्ये किती बदल झालेत. ते मुख्यमंत्र्यांनी पहावे. आदिवासी असलेला हा एक नवखा युवक त्याला पराभूत करण्यासाठी अख्ख्या सरकारची यंत्रणा राबते आहे. उत्तर प्रदेशातील भाडोत्री नेते प्रचाराला येताहेत. का बरं? तुमच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून का? अशी टिका त्यांनी केली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv Senaशिवसेना