शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेशी वारंवार पंगा घेणे भाजपला पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:19 IST

गेली साडे तीन वर्षे भाजपाने विशेषत: विष्णू सवरा यांनी शिवसेनेशी निष्कारण वारंवार पंगा घेतला त्याचा परिणाम शिवसेनेने त्यांना व त्यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची संधी साधण्यात झाला.

नंदकुमार टेणीपालघर : गेली साडे तीन वर्षे भाजपाने विशेषत: विष्णू सवरा यांनी शिवसेनेशी निष्कारण वारंवार पंगा घेतला त्याचा परिणाम शिवसेनेने त्यांना व त्यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची संधी साधण्यात झाला. त्यातूनच श्रीनिवास वनगांच्या हायजॅकींगचे नाट्य घडले प्रत्येक छोटया मोठया प्रसंगी सवरा शिवसेनेला हेतूत: डिवचत गेले त्याची ही परिणती होती.अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणूकीत शिवसेनेला उपाध्यक्षपद द्यायचे ठरले होते, एकदा पद द्यायचे ठरले की ते कुणाला द्यायचे हा निर्णय संबधीत पक्षाचा असतो त्यात कुणीच ढवळाढवळ करीत नाही. परंतु युतीचा हा नियम सवरांनी यावेळी मोडला उपाध्यक्षपद सेनेला द्यायचे ठरल्यावर प्रकाश निकम यांना ते देण्याचे सेनेने ठरवले ऐन मतदानाच्या दिवशी सवरांनी प्रकाश निकम हे मला मंजूर नाहीत दुसरा उमेदवार निवडा नाहीतर हे पद आम्ही सेनेला देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे ऐन वेळी यापदी वाडयाच्या निलेश गंधे यांची वर्णी लागली आता निकम यांना विरोध का तर ते २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत सवरांचे प्रमुख विरोधक होते व क्रमांक २ ची मते मिळवून त्यांनी सवरांना घाम फोडला होता.असाच प्रकार भाजपाने अनेक वेळा केला . या जिल्हयात सवरा म्हणजेच भाजप असल्याने या प्रकारांचे कर्ते करविते सवरा हेच होते. पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजप युती आहे. त्या जोरावरच भाजप सत्ताधारी बनली त्यामुळे काही समित्यांची पदे शिवसेनेला देण्याचे ठरले होते परंतु जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापतीपद देण्याचे ठरवूनही ते बहुजन विकास आघाडीला देण्यात आले. तसेच समाजकल्याण समिती सभापतीपद भाजपला देण्याचे मान्य करूनही ऐन वेळी ते भाजपाने स्वताकडे घेतले. युती असल्यामुळे अडीच वर्षे जि.प. चे अध्यक्षपद सेनेला द्यावे ही सेनेची मागणीही भाजपाने झिडकारून लावली. डहाणू पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती पद भाजपाने सेनेऐवजी बविआला मिळवून देणे श्रेयस्कर मानले. जिल्हा नियोजनच्या निवडणूकीत असेच झाले भाजप-सेना युतीकडे ९ मते होती असे असतांना सेनेच्या प्रकाश निकम यांना पाडून हे महत्वाचे पद राष्टÑवादीच्या सदस्याला मिळवून देण्यात भाजपाने धन्यता मानली. कोणत्याही समितीवर भाजपने एकाही सेनाकार्यकर्त्याची नियुक्ती होऊ दिली नाही. याचा बदला शिवसेनेने मोखाडा, जव्हार, या नगरपंचायतीत सत्ता मिळवून घेतला. पालघर नगर परिषदेतही भाजपाला धूळ चारली विक्रमगडमध्ये निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीला छुप्पा पाठिंबा देऊन सत्तेवर आणली. वाडा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत सवरांची कन्या निशा हिचा दारूण पराभव केला तसेच नगरपंचायतीची सत्ताही काबीज केली. शिवसेना अशी एका पाठोपाठ एक पराभवाचे जोरदार रट्टे देत होती तरी सवरा आणि भाजप यांना शहाणपण येत नव्हते. तर सेनेला चेव चढत होता त्यातूनच ठाणे जि.प. मध्येही सेनेची सत्ता आली. आता याच विजय मालिकेची पुनरावृत्ती घडविण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे.>महाजन नीतीचा विसरजर सवरा यांनी प्रमोद महाजनांची नीती अनुसरून जिल्हयातील शिवसेनेला सांभाळले असते तर सगळेच चित्र वेगळे दिसले असते परंतु हम करे सो कायदा या मुजोरीमुळे भाजपा आणि सवरा या सगळयांचेच नुकसान झाले आहे.